
निपाणी ः अपघात
2696
झुलपेवाडीतील शेतकऱ्याचा
विजेचा धक्का लागून मृत्यू
उत्तूर ः झुलपेवाडी (ता. आजरा) येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. गावंदर नावाच्या शेतात सकाळी आठ वाजता ही घटना घडली. याबाबात जानबा सुभाना धुमाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पावले सकाळी शेताकडे जनावारांना चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या हाताचा स्पर्श धुमाळ यांनी शेताभोवती केलेल्या कुंपणाच्या तारेला लागला. तारेला इलेक्ट्रिक सप्लाय दिला होता. यामुळे पावले याना जोराचा धक्का लागला व ते जागीच मृत झाले. याबाबत त्यांचा भाऊ शिवाजी दत्तू पावले यांनी फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक हारुगडे करीत आहेत.
तानिया व्होरा
23995
अपघातात जखमी मुलीचा मृत्यू
कागल ः महामार्गावरील यमगर्णी ते सहारा हॉटेल या दरम्यान रविवारी झालेल्या मोटारसायकल व कार अपघातातील जखमी मुलीचा उपचारावेळी कोल्हापूर येथे मृत्यू झाला. तानिया प्रतिक व्होरा (वय ७, मुंबई) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी कार (एमएच ४७ एयू ४६६१) बेळगावच्या दिशेने जात होती. याचवेळी मोटारसायकल (एमएच ०९ एफडब्ल्यू ६५३८) निपाणीच्या दिशेने येत होती. यमगर्णी बसस्थानकापासून पुढे कार व मोटार सायकलींमध्ये अपघात झाला. त्यात प्रतिक व्होरा व त्यांची मुलगी तानिया यांना गंभीर दुखापत झाली. शिवाय मोटार सायकलवरील प्रसाद चव्हाण (कसबा सांगाव) गंभीर जखमी झाले. प्रतिक, तानिया व प्रसाद यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविले होते. उपचारावेळी तानियाचा मृत्यू झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60965 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..