पत्निला मारणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्निला मारणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल
पत्निला मारणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

पत्निला मारणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

2696
झुलपेवाडीतील शेतकऱ्याचा
विजेचा धक्का लागून मृत्यू
उत्तूर ः झुलपेवाडी (ता. आजरा) येथील विश्वास दत्तू पावले (वय ५४) यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. गावंदर नावाच्या शेतात सकाळी आठ वाजता ही घटना घडली. याबाबत जानबा सुभाना धुमाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पावले सकाळी शेताकडे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या हाताचा स्पर्श धुमाळ यांनी शेताभोवती केलेल्या कुंपणाच्या तारेला लागला. तारेला इलेक्ट्रिक सप्लाय दिला होता. यामुळे पावले यांना जोराचा धक्का लागला व ते जागीच मृत झाले. याबाबत त्यांचा भाऊ शिवाजी दत्तू पावले यांनी फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक हारुगडे करीत आहेत.

टोप येथे मारहाण
नागाव : गाडी रेस केल्याच्या रागातून गंगाराम नगर टोप येथे दोघांना मारहाण झाली.‌ याप्रकरणी चौघांवर शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किरण शिवाजी कुऱ्हाडे, अनिकेत भीमराव पोवार, प्रेम लघमन्ना पोवार व अमोल भीमराव पोवार अशी त्यांची नावे आहेत. अजय जगदीश नलवडे याने तक्रार दिली आहे. माहिती अशी : धीरज दीपक नलवडे हा शिवशक्ती मंडळाच्या कट्ट्यावर बसला होता. यावेळी किरण, अनिकेत, प्रेम व अमोल यांनी आमच्यासमोर गाडी रेस करतोस असे म्हणून धीरजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चावा घेऊन जखमी केले.

वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार
नागाव : अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाला. पुणे - बंगळूर महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीमधील परफेक्ट पिन कंपनीसमोर आज रात्री साडेनऊला अपघात झाला. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : अनोळखी पादचारी शिरोली एमआयडीसीतून शिये फाट्याकडे निघाला होता. परफेक्ट पिनसमोर मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने पादचाऱ्यास धडक दिली. धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती. या घटनेची माहिती मिळताच शिरोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. मृताचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

तानिया व्होरा
23995
अपघातात जखमी मुलीचा मृत्यू
कागल ः महामार्गावरील यमगर्णी ते सहारा हॉटेल या दरम्यान रविवारी झालेल्या मोटारसायकल व कार अपघातातील जखमी मुलीचा उपचारावेळी कोल्हापूर येथे मृत्यू झाला. तानिया प्रतीक व्होरा (वय ७, मुंबई) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी कार (एमएच ४७ एयू ४६६१) बेळगावच्या दिशेने जात होती. याचवेळी मोटारसायकल (एमएच ०९ एफडब्ल्यू ६५३८) निपाणीच्या दिशेने येत होती. यमगर्णी बसस्थानकापासून पुढे कार व मोटार सायकलीमध्ये अपघात झाला. त्यात प्रतीक व्होरा व त्यांची मुलगी तानिया यांना गंभीर दुखापत झाली. शिवाय मोटारसायकलवरील प्रसाद चव्हाण (कसबा सांगाव) गंभीर जखमी झाले. प्रतीक, तानिया व प्रसाद यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलविले होते. उपचारावेळी तानियाचा मृत्यू झाला.

पत्नीला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा
कोल्हापूर ः अंगावर चारचाकी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून उत्तम शिवाजी पोवार (रा. बालिंगा) याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच या प्रकरणी एका महिलेवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम यांची पत्नी राजारामपुरी येथील त्यांच्या माहेरी राहाण्यास आली होती. तेथे उत्तम आणि एक महिला दोघे आले. दोघांनी उत्तम यांच्या पत्नीला मारहाण केली तसेच त्यांच्या अंगावर चारचाकी गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उमळवाडच्या एकाला कोठडी
जयसिंगपूर : उमळवाड (ता. शिरोळ) येथे सहा तलवारी व गांजासदृश अमली पदार्थ आढळल्याप्रकरणी दिलदार चौगोंड कांबळे याला जयसिंगपूर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले होते. आज येथील प्रथमवर्ग न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60974 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..