मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोर्चा
मोर्चा

मोर्चा

sakal_logo
By

२३९३५  
महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे मोर्चा

केंद्र शासनाचा निषेध; गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चूल मांडून थापल्या भाकरी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. २३ : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. गॅस दरवाढीच्या निषेधार्थ महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर चूल मांडून भाकऱ्या करून केंद्र शासनाचा निषेध केला. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाकरी चटणी खाऊन निषेध केला.
घरगुती गॅसचा दर एक हजारच्या पुढे गेला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. दीड महिन्यात सीएनजीच्या दरात चारवेळा वाढ केली. घरगुती सिलिंडरचे दर महिन्यात दोनदा वाढवले आहेत. दरवाढीमुळे सर्वसामान्य आणि व्यावसायिकांचे बजेटही कोलमडणार असून महागाई आणखी वाढेल. जनतेच्या सहनशिलतेचा अंत न पाहता केंद्र सरकारने महागाई कमी करावी अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा शहर राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे दिला.
शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. पेट्रोल-डिझेलमुळे दूध भाजीपाला, मांस, अंडी, डाळी, गहू, खाद्य तेल यांसारखे खाद्यान्न तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात महागाईचा आगडोंब उसळला आहे. मार्च महिन्यात घाऊक बाजारातील महागाई दर १४.५५ टक्के वाढला. मागील १७ महिन्यांतील किरकोळ महागाईचा दरही उच्चांकी आहे. महागाईला केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत असून केंद्र सरकारने सामान्य नागरिकांचे जीणे हराम केले असून सामान्य माणूस या महागाईच्या आगडोंबात होरपळून निघत आहे, असे आर. के. पोवार म्हणाले.
आंदोलनात भय्या माने, के. पी. पाटील, आदिल फारस, राजेश लाटकर, सुनील देसाई, युवराज पाटील, राजू आवळे, नाविद मुश्रीफ, शीतल फराकटे, जाहिदा मुजावर, मधुकर जांभळे, नितीन पाटील, पूजा साळोखे, संजय कुराडे, रामचंद्र भाले, अनिल घाटगे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60979 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top