
पालिका सभागृहासाठी आवश्यक निधी देणार ः खासदार माने
24032
इचलकरंजी ः खासदार धैर्यशील माने यांना निवेदन सादर करताना माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्यासह कार्यकर्ते.
पालिका सभागृहासाठी
आवश्यक निधी देणार
खासदार माने यांची शिष्टमंडळाला ग्वाही
इचलकरंजी, ता. २४ ः गोवा विधानसभा धर्तीवर उभारण्यात आलेले इचलकरंजी पालिकेचे सभागृह सर्व सुविधांनी सुसज्ज असेल. त्यासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
येथील पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या सभागृहाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह असे नाव देण्याचा पालिकेचा ठराव एकमताने झाला आहे. सभागृह वापरात येण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामध्ये इंटेरिअर, फर्निचर, तीन लिफ्ट, सोलर पॅनेल सिस्टीम, अग्निशमन योजना, कारपेट, रंगकाम, साऊंड प्रूफ, इलेक्ट्रिकल काम, वायफाय सिस्टीम आदी सुविधा महत्त्वाच्या आहेत. यासाठी सहा कोटी ३९ लाख ७१ हजार ७०० रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे.
याबाबत शासनाकडून लागणारा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी रजपुते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार माने यांच्याकडे कोल्हापूर येथे निवेदनाद्वारे केली. इचलकरंजी आता महापालिका होणार आहे. त्यामुळे नवीन सभागृह हे सुसज्ज असलेच पाहिजे. त्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली असेल, अशी ग्वाही माने यांनी यावेळी दिली. इचलकरंजी महापालिकेची पहिली सभा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिष्टमंडळात माजी नगरसेवक राजाभाऊ कांबळे, राजू भडंगे, दीपक भोसले, जगदीश कांबळे, प्रमोद कदम, डी. एस. डोणे, अरुण कांबळे, प्रदीप कांबळे, संजय कट्टी, अमोल कविशिल, मिलिंद कांबळे, पंकज कांबळे, वृषभ कांबळे, अभिजित चव्हाण यांचा समावेश होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61032 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..