देसाई हॉस्पिटलतर्फे रविवारी पोलिसांची आरोग्य तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई हॉस्पिटलतर्फे रविवारी पोलिसांची आरोग्य तपासणी
देसाई हॉस्पिटलतर्फे रविवारी पोलिसांची आरोग्य तपासणी

देसाई हॉस्पिटलतर्फे रविवारी पोलिसांची आरोग्य तपासणी

sakal_logo
By

देसाई हॉस्पिटलतर्फे रविवारी
पोलिसांची आरोग्य तपासणी
गडहिंग्लज, ता. २४ : येथील देसाई हॉस्पिटलचा ३७ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त गडहिंग्लज पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी-कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. रविवारी (ता.२९) सकाळी दहा ते दुपारी एक या कालावधीत पोलिस ठाण्याच्या आवारात हे शिबिर होईल. पोलिस कर्मचारी २४ तास सेवेत असतात. त्यांच्यावर कामाचा ताण मोठा असतो. पण, आरोग्याची काळजी घेण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर देसाई, डॉ. रोहित देसाई यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61143 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top