राज्यशशास्त्र परिषदेच्या मागण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यशशास्त्र परिषदेच्या मागण्या
राज्यशशास्त्र परिषदेच्या मागण्या

राज्यशशास्त्र परिषदेच्या मागण्या

sakal_logo
By

राज्यशास्त्र परिषदेचा विविध मागण्यांसाठी
राज्यव्यापी लढा उभारणार : प्रा. पवार
कोल्हापूर, ता. २४ : राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची राज्यव्यापी सभा आभासी पद्धतीने पार पडली. संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यशास्त्र विषयाबाबत विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा लढा कसा उभा करायचा याबाबत चर्चा, नियोजन केले आहे.प्रा. पवार यांनी राज्य सरकारकडे प्रामुख्याने कराव्याच्या तीन मागण्याबाबत माहिती दिली. मागण्या मान्य करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना एकाच दिवशी एकावेळी निवेदन देण्यात येईल. त्यासाठी प्रा. पवार यांनी प्रत्येक जिल्हास्तरावर २७ मेपर्यंत सर्व बैठकींचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या. तसेच ३६ जिल्ह्यातील बैठकीला मार्गदर्शन संदर्भातील सूचना देण्याकरिता जिल्हानिहाय प्रतिनिधीची नेमणूक केली. या लढाईत राज्यभरातील सर्व राज्यशास्त्र विषयाचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सहभागी होतील.

परिषदेच्या मार्गदर्शक मंडळाचे प्रमुख प्रा. विजय बर्गे म्हणाले, ‘‘राज्यशास्त्र परिषद ही एकमेव संघटना आहे. जी संपूर्ण महाराष्ट्रात एकसंघ कार्य करते. अशा कार्याचे श्रेय परिषदेचे तरुण नेतृत्व प्रा. पवार, सर्व पदाधिकारी, सदस्यांना जातो. जे त्यांच्यावर विश्वासाने कार्य करतात.’’ प्रा. संजय सुतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. रमेश टाकणखार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुरेश नारायणे यांनी आभार मानले. सभेला राज्य कार्यकारिणीचे मार्गदर्शक मंडळ, विभाग कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
...

चौकट

राज्यशास्त्र परिषदेच्या मागण्या अशा
१) राज्यशास्त्र विषय कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर इंग्रजी-मराठी विषयाप्रमाणे अनिवार्य करावा.
२) इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या नवीन अभ्यासक्रमात बदल करून त्यात ''भारतीय संविधानाची ओळख'' करून देणारा नवीन अभ्यासक्रम तयार करावा.
३) राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय अघोषित २० टक्के, ४० टक्के विनाअनुदानित असतील त्यांना त्वरीत शंभर टक्के अनुदान द्यावे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61176 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top