संभाजी ब्रिगेड निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संभाजी ब्रिगेड निवेदन
संभाजी ब्रिगेड निवेदन

संभाजी ब्रिगेड निवेदन

sakal_logo
By

संभाजी ब्रिगेडचे
उद्या धरणे आंदोलन
कोल्हापूर ः पोल्‍ट्री हा शेतीपूरक व्यवसाय असल्याने ग्रामीण भागात पोल्ट्रीचा घरफाळा तसेच व्यवसाय कर रद्द करावेत, यासह विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे गुरुवारी (ता. २६) आंदोलन होणार आहे. लाईन बझार रोडवरील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयासमोर सकाळी अकराला हे आंदोलन होईल. प्रमुख मागण्या अशा ः कोंबडी संगोपन खर्च वाढवावा, कोंबडी खरेदी करणाऱ्या कंपनीने लिप्टिंग खर्च स्वतः करावा अथवा प्रतिकिलोला एक रुपया लिप्टिंग खर्च द्यावा, लहान पक्षी, खाद्य, औषधांचे बेकायदेशीररित्या वाढवलेले दर कमी करावेत, पोल्ट्री फार्मधारकांना दोन आठवड्यांत नवे पक्षी द्यावेत, जीवंत पक्ष्यांचे दर हे ट्रेडरकडून जाहीर न करता पशुसंवर्धन विभागाने जाहीर करावेत, कोंबडीचे किरकोळ विक्रीचे दर नियंत्रणात ठेवावेत आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे, अशी माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61204 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top