रयतसेवक सेवा संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रयतसेवक सेवा संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र शिंदे
रयतसेवक सेवा संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र शिंदे

रयतसेवक सेवा संस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र शिंदे

sakal_logo
By

कसबा तारळे विकास सेवा संस्थेत
शेकाप, भाजप आघाडीचे वर्चस्व
कसबा तारळे : येथील सर्वांत जुन्या कसबा तारळे येथील विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्तारूढ शेतकरी कामगार पक्ष व भाजप आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले. परिवर्तन आघाडीच्या काही उमेदवारांनी लक्षणीय झुंज दिली. पोलिस बंदोबस्तात जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत निवडणूक प्रक्रिया झाली. शेकापचे ज्येष्ठ नेते भोगावतीचे माजी संचालक दत्तात्रय हणमा पाटील व भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व्ही. टी. जाधव यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीने मोर्चेबांधणी करण्यात यश मिळवले. विरोधी आघाडीचे नेतृत्व माजी अध्यक्ष सुभाष नाना पाटील, जिल्हा शिक्षक पतपेढीचे माजी उपाध्यक्ष एन. के. पाटील, गुरुनाथ पाटील आदींनी केले. ६५५ मतदारांनी हक्क बजावला. विरोधी परिवर्तन आघाडीचे उमेदवार माजी अध्यक्ष शिवाजी धोंडी पाटील केवळ तीन मतांनी पराभूत झाले. विजयी उमेदवार असे : व्ही. टी. जाधव, दत्तात्रय गोपाळा पाटील, शंकर केरबा पाटील, साताप्पा राजाराम कांबळे, सुनील महादेव पाटील, संजय राजाराम सुतार, गणपती यशवंत पाटील, हसन आप्पासाहेब नायकवडी, लता संजय पाटील, वैष्णवी विकास पाटील, संभाजी विठ्ठल सायेकर, सचिन शिवाजी कांबळे, मधुकर महादेव डवरी.

००३३९
00340

रयतसेवक सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी शिंदे
असळज : येथील रयतसेवक विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र शिवराम शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी आत्माराम तुकाराम पाटील यांची बिनविरोध निवड केली. संस्थेने सलग पंचवीस वर्षे बिनविरोधची परंपरा जपत याही वर्षी निवडणूक बिनविरोध केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक अनिता शिंदे होत्या. संचालक असे ः मानसिंग पाटील, कृष्णा म्हेतर, संजय महाडिक, दत्तात्रय गुरव, सीताराम भित्तम, काशिनाथ कांबळे, सीताराम जाधव, नारायण पाटील, कल्पना शिंदे, शोभा म्हेतर. सचिव मारुती सावंत यांनी आभार मानले.

24108
कोथळीच्या सरपंचपदी भरतेश खवाटे
दानोळी ः कोथळी (ता. शिरोळ) येथील सरपंचपदी भरतेश सुकुमार खवाटे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया झाली. निवडणूक अधिकारी मंडल अधिकारी संजय सुतार होते. अध्यक्षस्थानी मावळते सरपंच ऋषभ पाटील उपस्थित होते. सरपंच ऋषभ पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी आज निवड प्रक्रिया झाली. गटनेत्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे खवाटे यांची एकमताने निवड केली. स्वागत विजय खवाटे यांनी केले. माजी उपसभापती राजगोंडा पाटील, शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळ अध्यक्ष संजय नांदणे, यड्राव बँकेचे उपाध्यक्ष दिलीप मगदूम, प्रा. एस. टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
धनगोंडा पाटील, डॉ. दिलीप पाटील, चंद्रकांत शिरोटे, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली ईससरांना, श्रीकांत पाटील, जितेंद्र शामगोंडा, राजेंद्र घाटगे, राजगोंडा खवाटे, गौतम पाटील, उपसरपंच राजश्री सुतार, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, विपुल नांद्रे, वर्धमान इंगळे, प्रकाश पुजारी, सुकुमार नेजकर, शैलेश तिवडे, राजेश विभुते, तलाठी माळी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


बोरपाडळे : बोरपाडळे परिसरात पावसाने वाफसा दिल्याने शेत मशागतीना वेग आला आहे. बांध घालणे, सड वेचणी, फणकट, सरी सोडणे, उसाची भांगलण आणि कुळवट आदी कामांना वेग आला आहे. शहापूर येथील पाझर तलावाजवळील नवखिल्लारी बैलांकरवी कुळवट करणाऱ्या सुभाष महापुरे या शेतकऱ्याचे छायाचित्र टिपले बोरपाडळे बातमीदार अनिल एच. मोरे यांनी.

१५०२
१५०१
रंगराव पाटील अध्यक्षपदी
हळदी ः देवाळे (ता. करवीर) येथील महालक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी रंगराव पांडुरंग पाटील व उपाध्यक्षपदी शंकर कृष्‍णा धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी वसंतराव पाटील होते. संचालक मंडळ असे ः पांडुरंग पाटील, अशोक पाटील, रंगराव पाटील, केरबा पाटील, कृष्णा पाटील, मनोहर कलकुटकी, भिकाजी लोखंडे, प्रतिभा पाटील, अंजना पाटील. आभार सचिव बाजीराव शेळके यांनी मानले.

कुर्डुतील ‘रेणुका’ शेतकरी विकासकडे
हळदी ः कुर्डू (ता. करवीर) येथील रेणुका विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी सेवा विकास पॅनलने पंचवार्षिक निवडणुकीत १० विरुद्ध २ अशा फरकाने विजय मिळवत विरोधी लोकसेवा विकास आघाडीचा पराभव केला. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत गोविंद पाटील यांनी केले. विरोधी आघाडीचे नेतृत्व जयसिंग खंडू पाटील यांनी केले. विजयी उमेदवार ः मारुती पाटील, बाळासो पाटील, दिनकर पाटील, पांडुरंग साठे, जयवंत पाटील, नेताजी पाटील, अमर साठे, संदिप सुतार, छाया पाटील, वंदना पाटील, सहदेव कांबळे, आनंदा साठे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदिप मालगावे यांनी काम पाहिले.

00192
उंड्री आरोग्य उपकेंद्रात रक्तदाब दिन
देवाळे ः उंड्री (ता. पन्हाळा) उपकेंद्रात जागतिक उच्च रक्तदाबदिन साजरा केला. उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी तीस वर्षांवरील नागरिकांचा रक्तदाब तपासणी केली. तसेच मोफत औषधे वाटप केली. उच्च रक्तदाब होऊ नये म्हणून नागरिकांना आहार आणि जीवनशैली विषयी मार्गदर्शन केले. डॉ. जाधव यांनी ग्रामीण आरोग्य उपकेंद्रांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यावरील गोळ्या मोफत मिळतात त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61210 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top