नाला गाळ काढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाला गाळ काढावा
नाला गाळ काढावा

नाला गाळ काढावा

sakal_logo
By

24186

शेतात टाकणारी भर थांबवा
--
उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ युवा संघटनेकडून निवेदन

कोल्हापूर, ता. २४ ः उत्तरेश्वर पेठेतून जिव्हाळा कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, शिंगणापूर या रस्त्याच्या दोन्ही बाजूला टाकली जात असलेली भर थांबवावी. तेथील नाल्यातील गाळ काढावा, अशी मागणी श्री उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ युवा संघटनेने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे, हा रस्ता निमुळता असून दोन्ही बाजूस शेती आहे. तिथे दुधाळी नाला पंचगंगेत मिसळतो. गेल्या काही वर्षांपासून काही शेतकरी शेताची उंची भर टाकून वाढवत आहेत. दोन्ही बाजूला भर टाकल्यामुळे रस्त्यापेक्षा शेती उंच झाली आहे. परिणामी थोडासा पाऊस पडला की पाणी साचून राहते. जास्त पाऊस झाला की उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ या नदीलगतच्या भागांमध्ये पाणी साठते व पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत होते. येथील नाल्यातील गाळ काढून वीस ते तीस वर्षे झाले असतील असे या भागातील लोक सांगतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोंडाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे, यात लवकर लक्ष घालून निर्णय घ्यावा. यावेळी मोहसीन मणेर, अनिस बागवान, रोहित पाटील, युनूस बागवान, आशिष पोवार, ओंकार चव्हाण, मधुकर चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61213 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top