पत्रकेच पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकेच पत्रके
पत्रकेच पत्रके

पत्रकेच पत्रके

sakal_logo
By

सेवानिवृत्त कर्मचारयांचा उद्या वर्धापन दिन
कोल्हापूर : जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. 26) दुपारी दोन वाजता संघटनेच्या सभासदांचा अमृतमहोत्सवी सत्कार, व्याख्यानाचे आयोजन केल्याची माहिती अध्यक्ष हिंदुराव पाटील, कार्यवाह नंदकुमार रामाणे यांनी दिली.
वयाची ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा सभासदांचा सत्कार होईल. ‘कोल्हापूर सेवानिवृत्त समाचार’ अंकाचे प्रकाशनही केले जाईल. प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांचे ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ यावर व्याख्यान होईल. प्रिन्स मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बाळकृष्ण बोराडे, लेखापाल श्रीमती संजना वाडेकर, सहाय्यक कोषागार अधिकारी श्रीमती अरुणा हसबे, उपलेखापाल विनायक वडेरउपस्थित राहतील. हा कार्यक्रम शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयातील हॉलमध्ये होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेने पत्रकाद्वारे केले आहे.


शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निवड
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाह कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल आणि अंतर्गत गुणवत्ता कक्षातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. रोजगार मेळाव्याचे उद्‌घाटन आय प्रो टेकचे संचालक अभय माने यांच्या हस्ते झाले. श्री. माने म्हणाले, ‘‘ग्रॅज्युएशन नंतर करिअरच्या अनेक संधी निर्माण होतात. आपल्याकडे ‘स्कील’ असणे महत्त्वाचे आहे. आपणाकडे असणाऱ्या ‘स्कील’च्या माध्यमातून आपणास जॉब मिळू शकतो. सध्या आय.टी. क्षेत्रात ७० टक्के जॉब उपलब्ध आहेत.’’ हार्डवेअर, सॉप्टवेअर, नेटवर्किंग याविषयी माहिती दिली. प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार म्हणाले, ‘‘नोकरी मिळविण्यासाठी स्कीलची आवश्यकता आहे.’’ उपप्राचार्य डॉ. के. व्ही. गायकवाड, आयक्युएसी समन्वयक डॉ. एस. पी. पवार आदी उपस्थित होते. रोजगार मेळाव्यामध्ये २१५ विद्यार्थी सहभागी झाले. यामधून ५८ विद्यार्थ्यांची निवड आय प्रो टेकमध्ये झाली. रोजगार मेळाव्याचे समन्वयक डॉ. ए. जी. धोडमणी यांनी स्वागत केले. डॉ. बी. बी. घुरके यांनी आभार मानले. प्रा. दिपाली माळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.
...


24202
कोल्हापूर : कमला कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ प्रसंगी राजलक्ष्मी कदम हिला आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार देताना डॉ. पी. एस. पाटील, डॉ. क्रांतीकुमार पाटील, प्राजक्त पाटील, डॉ. तेजस्विनी मुडेकर.

कमला कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक
कोल्हापूर : कमला कॉलेजचा वार्षिक पारितोषिक समारंभ झाला. प्रभारी कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख होते. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रभारी कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘कमला कॉलेजची शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कामगिरी उत्कृष्ट आहे. आपल्या शिवाजी विद्यापीठाने २७८ विद्यापीठात दहावा क्रमांक मिळविला आहे. विद्यार्थिनीला हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करून यश मिळवावे शिक्षणाची आस, अभ्यासाची ध्यास धरून ध्येयपूर्ती करता येते.’’ प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी विद्यार्थीनींच्या शैक्षणिक विकासासाठी विविध तज्ज्ञाची व्याख्याने, विविध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, एन.सी.सी.चे उपक्रम महत्वाचे ठरतात. महाविद्यालयाची चौफेर प्रगती पाहून ॲटोनॉमस दर्जा दिला आहे, असे सांगितले. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार शुभांगी घराळ हिला तर कमलाची आदर्श विद्यार्थिनी म्हणून राजलक्ष्मी कदम हिला सॉर्ड ऑफ ऑनरचा पुरस्कार मिळाला. सचिव प्राजक्त पाटील उपस्थित होत्या. प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, प्रा. डॉ. अनिल घस्ते, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. स्वाती कांबळे, डॉ. सुनिता काळे, प्रा. एच. व्ही. पुजारी, प्रा. वर्षा साठे यांचे सहकार्य लाभले. प्रा. डॉ. निता धुमाळ यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. रेखा पंडित यांनी आभार मानले. प्रा. ए. एम. साळोखे, प्रा. एन. एस. शिरोळकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61226 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top