स्तुती अंतर्गत काश्मिर विद्यापीठात सेमिनार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तुती अंतर्गत काश्मिर विद्यापीठात सेमिनार बातमी
स्तुती अंतर्गत काश्मिर विद्यापीठात सेमिनार बातमी

स्तुती अंतर्गत काश्मिर विद्यापीठात सेमिनार बातमी

sakal_logo
By

काश्‍मीर विद्यापीठात
‘स्तुती’ प्रशिक्षण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः केंद्र सरकारच्या स्तुति प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातून किमान दहा हजार तज्ज्ञ प्रशिक्षित व्हावेत, अशी अपेक्षा केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार एस. एस. कोहली यांनी व्यक्त केली. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि काश्मीर विद्यापीठ, श्रीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुति (सिनर्जिस्टीक ट्रेनिंग प्रोग्राम युटिलाइझिंग दि सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) या सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली. याच्या उद्‍घाटनप्रसंगी कोहली बोलत होते. श्रीनगर येथील काश्मीर विद्यापीठात प्रशिक्षण आयोजित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून स्तुति उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. त्यातील हा दुसरा उपक्रम आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून काश्मीरच्या उपराज्यपालांचे सल्लागार आर. आर. भटनागर, काश्मीर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. निलोफर खान, काश्मीर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तलत अहमद, अनंतनाग येथील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरू डॉ. शाकील रामशो आदी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमात १५० प्राध्यापक व विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. रविवार (ता. २९) पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत वरिष्ठ तज्ज्ञ प्राध्यापक अत्याधुनिक वैज्ञानिक साधने व उपकरणे यांची प्रात्यक्षिकांसह माहिती देणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने येथील सैफ-सीएफसी केंद्राचे प्रमुख व स्तुति उपक्रमाचे समन्वयक डॉ. आर. जी. सोनकवडे यांचा आयोजनात सहभाग आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61313 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top