
आजरा ः गव्याच्या धडकेने जखमी
24251
आजरा ः गव्याच्या धडकेत मोटारीचे झालेले नुकसान.
गव्याच्या धडकेत
मोटारीचे नुकसान
चालक जखमी; आजऱ्याजवळील घटना
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २४ ः गवा अचानक आडवा आल्याने मोटारीला धडक बसून चालक जखमी झाला. आजरा- गडहिंग्लज मार्गावर आज सायंकाळी ही घटना घडली. अजित राजाराम सुतार (वय ४०, पिंपळगाव, ता. भुदरगड) असे जखमीचे नाव आहे. मोटारीचे नुकसान झाले आहे.
श्री. सुतार सावंतवाडीला गेले होते. तेथून मोटारीतून गावाकडे परतत असताना सुलगाव रोपवाटिका ओलांडून पुढे गेल्यावर अचानक गवा मोटारीच्या आडवा आला. प्रसंगावधान राखत सुतार यांनी गाडीचा वेग कमी केला. या वेळी गव्याने दोनही पाय बॉनेटवर ठेवून चालकाच्या बाजूकडून एक पाय सुतार यांच्या छातीवर लावला. गव्याच्या धडकेमुळे मोटारीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही घटना अन्य वाहनचालक पाहत थांबले. वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
इकडे गवा तिकडे हत्ती
याच रस्त्यावर गव्याने मोटारीला धडक दिली. दरम्यान, याच वेळी टस्कर रस्त्यावर आला. त्यामुळे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प होती.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61325 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..