नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा

नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा

sakal_logo
By

24349
निट्टूर (ता. चंदगड) : येथे नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी व शिक्षक.


नरसिंह हायस्कूलमध्ये स्नेहमेळावा
कोवाड, ता. २५ : निट्टूर (ता. चंदगड) येथील नरसिंह हायस्कूलमध्ये १९८२-८३ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. तब्बल ३९ वर्षांनंतर शिक्षक व माजी विद्यार्थी एकत्र आले. माजी शिक्षक जे. जे. नार्वेकर यांच्या अध्यक्षस्थानी होते. प्राथमिक शिक्षक बळवंत लोढे यांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र येण्याची साद घातली. त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिल्याने माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकही उपस्थित राहिले. लोढे यांनी मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. माजी विद्यार्थी व शिक्षकांनी ४० वर्षांपूर्वीच्या आठवणी व घटनांना उजाळा दिला. तानाजी जाधव, एम. वाय. पाटील, अशोक पाटील, गणपत कदम, राजाराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61381 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top