रेंदाळ बँकेस सहकार्याची ग्वाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेंदाळ बँकेस सहकार्याची ग्वाही
रेंदाळ बँकेस सहकार्याची ग्वाही

रेंदाळ बँकेस सहकार्याची ग्वाही

sakal_logo
By

रेंदाळ बँकेस सहकार्याची ग्वाही
विविध संस्था, पदाधिकारी, सभासदांची बैठक; आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा दावा
इचलकरंजी, ता. २५ ः आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजीतील अडत पेठ शाखेत अपहार प्रकरण समोर आल्यानंतर रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील कवीवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालय सभागृहात व्यापक सभा झाली.
यावेळी रेंदाळ, हुपरी, रांगोळीमधील नागरी सहकारी पतसंस्था, सहकारी दूध व्यावसायिक संस्था, विकास सेवा सहकारी संस्था, सामाजिक संस्था, ट्रस्ट यांच्यासह प्रतिष्ठित व्यक्ती, सभासद यांची बैठक झाली. यावेळी सर्वांनी बँकेवर पूर्णपणे विश्वास व्यक्त करीत पुढील काळात नेहमीच बँकेच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी बँकेस सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची ग्वाही सर्वांनी दिली.
बँक अधिकारी के. एस. माळी यांनी स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत जाधव यांनी अपहार प्रकरणाचा आढावा घेतला. वैधानिक लेखा परीक्षकांकडून लेखा परीक्षण पूर्ण होताच अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्याचबरोबर अपहार करणाऱ्यांच्या स्थावर मिळकतीवर लवकरच टाच आणून विक्रीची प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येणार आहे. सध्या बँकेची आर्थिक स्थिती मजबूत आहे, असे श्री. जाधव यांनी सांगितले.
बँकेच्या इतिहासातील ही अघटित घटना असून, या प्रसंगाला सर्वांच्या सहकार्याने तोंड देऊन त्यातून बाहेर पडू, अशा विश्वास चेअरमन अरुण दत्तात्रय महाजन यांनी व्यक्त केला. ठेवी पूर्णतः सुरक्षित आहेत. ठेवीदारांनी विचलीत होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. व्हाईस चेअरमन रावसो बाबूराव कोळी यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61391 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top