...तर सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा
...तर सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा

...तर सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा

sakal_logo
By

...तर सोमवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा
बाळासाहेब कलागते; लाकूड ओढण्याच्या शर्यतीस परवानगीची मागणी
इचलकरंजी, ता. २५ : दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी लाकूड ओढण्याच्या शर्यतीस परवानगी दिली होती. मात्र, बेंदराच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीस प्रांताधिकाऱ्यांनी अॅनिमल ॲक्टचे कारण देत परवानगी नाकारली आहे. या पाठीमागे राजकीय शक्तीचा हात असून दोन दिवसांमध्ये परवानगी मिळाली नाही, तर आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (ता. ३०) प्रांत कार्यालयावर बैलांसह मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इचलकरंजीतील शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटकी बेंदरानिमित्त शासनाच्या नियमानुसार लाकूड ओढण्याच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यासाठी आवश्यक परवानगीसाठी प्रांत कार्यालयात गेले असता त्यांनी परवानगी नाकारली. असे करून हे अधिकारी शहरातील शतकोत्तर परंपरेला फाटा देण्याचाच प्रयत्न करीत आहेत. इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे सरकार यांनी १९०५ मध्ये शहरात लाकूड ओढण्याच्या शर्यती सुरू केल्या. त्यावेळेपासून दरवर्षी कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त या स्पर्धा घेतल्या जातात. त्यासोबत जनवरांचे प्रदर्शन, कर तोडणे आणि बक्षीस वितरण, असे कार्यक्रम घेण्यात येतात. कोरोनामुळे बेंदूर उत्सव मंडळातर्फे साध्या पद्धतीने बेंदूर साजरा करण्यात येत होता. राज्य शासनाने बैलगाडी शर्यतीवर बंदी उठवल्याने यंदा बेंदूर उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या परवानगीसाठी आमदार आवाडे शासन दरबारी प्रयत्नशील आहेत. दोन दिवसांमध्ये लाकूड ओढण्याच्या शर्यतीस परवानगी द्यावी. अन्यथा शेतकरी, तरुणांचा बैलांसह भव्य मोर्चा काढण्यात येईल, असे श्री. कलागते यांनी सांगितले. प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, नंदू उर्फ बाबासो पाटील, शेखर शहा, राहुल घाट, राजेंद्र बचाटे, बबलू सुतार, बजरंग कुंभार, बिलाल पटवेगार आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61453 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top