जरबेरीया शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जरबेरीया शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग
जरबेरीया शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

जरबेरीया शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

sakal_logo
By

24365, 24366
जेऊर (ता. आजरा) : येथील ग्रीन हाऊसमध्ये हेमंत पेडणेकर यांनी केलेली जरबेरिया फुलाची शेती. दुसऱ्या छायाचित्रात बाजारपेठेत फुले पाठवण्यासाठी पॅकिंग करताना कामगार.

जरबेरिया शेतीतून आर्थिक उत्पन्नाचा मार्ग
अभियंता हेमंत पेडणेकर यांचा प्रयोग यशस्वी; वर्षाला सरासरी सात ते आठ लाख उत्पन्न
रणजित कालेकर : सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ : जरबेरिया फूल शेतीतून अभियंत्यांनी आर्थिक उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. यातून ते वर्षाला सरासरी सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. हेमंत मनोहर पेडणेकर असे त्यांचे नाव आहे. त्यांनी शोधलेला मार्ग युवकांना प्रेरणा देणारा आहे.
पेडणेकर हे महावितरण कंपनीमध्ये नोकरीला होते. नंतर त्यांनी नोकरीला राजीनामा देऊन विद्युत कॉन्ट्रॅक्टर (ठेकेदार) म्हणून काम करण्यास सुरवात केली. आत्मिक समाधानासाठी त्यांनी शेतीचा मार्ग निवडला. त्यांनी जेऊर (ता. आजरा) येथे पाच वर्षांपूर्वी साडेसोळा एकर पडीक जमीन घेतली. या जमिनीमध्ये नैसर्गिक समतोल राखून शेतीसाठी जमीन तयार केली. यामध्ये दोन शेततळी उभारली असून, त्यांनी विविध पिकांची शेती केली आहे. यामध्ये काजू, आंबा, चिकू, पेरू यासारखी फळपिके, त्याचबरोबर जायफळ, मिरी, लवंग यासारखी मसाला पीक घेतली आहेत. रिकाम्या जागेत भात, नागली, भुईमूग यासारखी पिके घेत आहेत. पांडुरंग फुंडकर फलोत्पादन योजनेतून फळपिके, तर वनशेतीतून अडीच हजार जंगली झाडेही लावली आहेत. येथेच दहा गुंठे क्षेत्रावर ग्रीन हाऊस उभारले आहे. ग्रीन हाऊसमध्ये दोन वर्षांपूर्वी बेड पध्दतीने सहा हजार जरबेरियाची रोपे लावली. गेली दीड वर्ष ते यातून उत्पन्न घेत आहेत. दररोज एक हजार ते बाराशे फुलांचा तोडा होतो. यातून आठ मजुरांना रोजगार मिळाला आहे. ही फुले आजरा व गडहिंग्लजच्या स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवली जातात. त्याचबरोबर ट्रॅव्हल्सने मुंबई व हैदराबाद बाजारपेठतही पाठवली जात आहेत. स्थानिक बाजारपेठेत प्रती फूल चार रुपये ते पाच रुपये दर मिळत आहे. मुंबई व हैदराबाद बाजारपेठेत प्रती फूल तीन रुपये ते १२ रुपये असा दर मिळतो. स्थानिक बाजारपेठेत दर स्थिर असून, मेट्रो सिटीतील बाजारपेठेत दर कमी जास्त होतो. या पिकाचे खत, औषधे, किटकनाशक, टॉनिक याचे व्यवस्थापन अत्याधुनिक पध्दतीने राबविले जाते. पाणी व्यवस्थापनही काटेकोरपणे केले जाते. व्यावसायिक पध्दतीने ही शेती केली जात आहे. यातून त्यांना दरवर्षी खर्च वजा जाता सुमारे चार लाख रुपये निव्वळ वार्षिक उत्पन्न मिळत आहे. (क्रमशः)
-----------------
स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग यशस्वी
पाच गुंठे क्षेत्रावर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. हे पीकदेखील चांगले आले. या शेतीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले होते. त्यावेळी येथील स्ट्रॉबेरीची चव चाखल्यावर अन्य ठिकाणापेक्षा स्ट्रॉबेरीची गोडी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोगही यशस्वी झाला आहे.
----------------
कोट
दहा लाख रुपये खर्चून ग्रीन हाउस उभारले. याला शासनाचे अनुदान मिळाले आहे. यामध्ये जरबेरियाची फूल शेती करण्याचे ठरवले. फूल शेतीबाबत प्रशिक्षण व बाजारपेठेची माहितीही घेतली. या शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे. ही शेती फायद्याची आहे. युवकांनी शेती व्यवसायात नवे प्रयोग राबवावेत.
- हेमंत पेडणेकर, प्रयोगशील शेतकरी, गडहिंग्लज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61456 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top