मळवीतील पाणी टाकीची तीन वर्षापूर्वी स्वच्छता? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळवीतील पाणी टाकीची तीन वर्षापूर्वी स्वच्छता?
मळवीतील पाणी टाकीची तीन वर्षापूर्वी स्वच्छता?

मळवीतील पाणी टाकीची तीन वर्षापूर्वी स्वच्छता?

sakal_logo
By

मळवीतील पाणी टाकीची
तीन वर्षांपूर्वी स्वच्छता?
ग्रामस्थांचे बीडीओंना निवेदन; अस्वच्छ पुरवठ्यामुळे रोगराईची भीती
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २५ ः तुडीये (ता. चंदगड) ग्रामपंचायतींतर्गत मळवी (ता. चंदगड) गावाला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर अद्याप दुर्लक्ष आहे. गाळ साचल्यामुळे नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही त्यांचे दुर्लक्ष असल्याने ही टाकी त्वरित स्वच्छ करण्याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या गावासाठी २०१२ मध्ये नळपाणी पुरवठा योजना राबवण्यात आली. त्यासाठी स्वतंत्र जलकुंभ बांधला. तेथून दररोज नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. परंतु टाकीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. तीन वर्षांपूर्वी या टाकीत कावळा पडून मृत झाला होता. त्यावेळी ती स्वच्छ करण्यात आली होती. त्यानंतर मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. सध्या टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. गॅस्ट्रोसारख्या आजाराची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः स्थळपाहणी करून स्वच्छता कर्मचाऱ्यांना योग्य ती सूचना द्यावी. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्वच टाक्यांची नियमित स्वच्छता, टाकी स्वच्छ केलेली तारीख, पुढील स्वच्छतेची तारीख सुस्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने लिहावी आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर रामलिंग अर्जुन पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासंदर्भात सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61511 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top