
बावडा फुटबॉल क्लबतर्फे स्पर्धा
24400
कोल्हापूर : बावडा फुटबॉल क्लब आयोजित बावडा फुटबॉल प्रीमियर लीगचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमदार ऋतुराज पाटील, श्री राम सोसायटीचे संचालक, माजी नगरसेवक, खेळाडू आदी.
बावडा फुटबॉल प्रीमियर
लीगचे उद्घाटन
-----------------
आठ संघांत होणार सामने
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : कसबा बावडा येथे पॅव्हेलियन मैदानावर आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बावडा फुटबॉल क्लब आयोजित बावडा फुटबॉल प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. गतवर्षीप्रमाणे आठ संघांत हा थरार होणार आहे. प्रत्येक संघात १५ नवोदित खेळाडू आहेत. सर्व सामने हे साखळी पद्धतीने खेळले जातील. स्पर्धेसाठी ‘केएसए’चे पंच नेमले आहे.
विजेत्यांना अनुक्रमे ११ हजार १११, ७ हजार ७७७, उपविजेता फेरीतील दोन्ही बाद संघांना प्रत्येकी २५२५ रुपये आणि ट्रॉफी असे बक्षीस आहे.
प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अशी इतर वैयक्तिक बक्षिसे आहेत. जुबेर आयुब जमादार, रोहन पाटील, सचिन चौगले, सचिन नलवडे, मोहन सालपे, विजय बेडेकर, ॲड. नीलेश नरुटे, संभाजी जाधव, संभाजी हराळे, शैलेश पाटील, उत्तम वावरे, अनिल पाटील, राम सोसायटीचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, शिवाजी जाधव, स्वाती येवलुजे, माधुरी लाड, डॉ. संदीप नेजदार, सुभाष बुचडे, अशोक जाधव, श्रावण फडतारे, किशोर पाटील, मिलिंद पाटील, रोहित मोरे, गजानन बेडेकर, संदीप जाधव, श्रीप्रसाद वराळे, अजित पोवार आदी उपस्थित होते.
आयोजक संजय पाटील, प्रवीण रणदिवे, आदित्य कांबळे-सासने, अक्षय खोत, विजय वडर, योगेश चव्हाण, मनोज वेटाळे, ऋषिकेश फराकटे, हरीश काळे, टोनी बावडेकर, चेतन बिरंजे, वैभव गाताडे, जगनाथ लेंगारे, मिलिंद वावरे नियोजन करत आहेत. आज सकाळच्या सत्रात पहिला सामना मोहन सालपे स्पोर्टस विरुद्ध द बेकरी स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. बेकरी स्पोर्टस्ने सडन डेथवर एक गोल नोंदविला. सुजल थापा मॅन ऑफ दी मॅच ठरला. दुसरा सामना रावजी चहा स्पोर्टस् विरुद्ध नीलेश नरोडे स्पोर्टस् यांच्यात झाला. यात ट्राय बेकर ३-१ वर रावजी चहा स्पोर्टस् विजयी झाला. मॅन ऑफ दी मॅच ओम कोळी ठरला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61566 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..