‘गोडसाखर’चे रणांगण वरुणराजाच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडसाखर’चे रणांगण वरुणराजाच्या हाती
‘गोडसाखर’चे रणांगण वरुणराजाच्या हाती

‘गोडसाखर’चे रणांगण वरुणराजाच्या हाती

sakal_logo
By

‘गोडसाखर’चे रणांगण वरुणराजाच्या हाती
निवडणूक हालचालींना गती; ‘अ’-‘ब’ वर्ग सभासदांची प्रारुप यादी लवकरच
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीच्या हालचाली वेगावल्या आहेत. ‘अ’ व ‘ब’ वर्ग सभासदांची प्रारुप यादी लवकरच जाहीर होणार असून त्यावर हरकतींची प्रक्रिया सुरू होणार आहे. जून महिनाअखेरपर्यंत अंतिम मतदार यादीपर्यंतचा टप्पा पूर्ण झाला तरी जुलैमध्ये निवडणुका घ्यायच्या झाल्या तर वरूणदेवाची कृपा कशी राहणार, यावर बरेच अवलंबून आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांच्याकडून गोडसाखर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सहसंचालकांनी कारखान्याच्या संस्था सभासदांचे ठराव मागवून घेवून २४१ सभासदांची प्रारुप यादी कारखान्याला पाठविली आहे. या यादीसह ‘अ’ वर्ग सभासदांची कच्ची यादी तातडीने पाठविण्याची लेखी सूचना सहसंचालकांनी कारखान्याला दिली आहे. ‘अ’ व ‘ब’ वर्गाच्या दोन्ही याद्या सहसंचालकांकडे प्राप्त झाल्यानंतर त्याचा स्वतंत्र कार्यक्रम प्रसिद्ध होईल. हरकती, त्यावरील सुनावणीनंतरच मतदार यादीला अंतिम स्वरुप येणार आहे. अंतिम यादीनंतर दहा दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. परंतु, प्रारुप ते अंतिम यादीसाठी २५ दिवसांचा कालावधी लागतो. म्हणजेच जून महिनाअखेर ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर दहा दिवसांनी निवडणूका म्हणजे जुलै उजाडणार असून तेंव्हा पावसाचे धुमशान ठरलेले असते. त्यावेळची परिस्थिती कशी असणार हे आताच सांगता येणार नसले तरी वरूण राजाच्या हातातच कारखाना निवडणुकीची दोरी आहे. जुलैमधील शक्यतेने पावसाळ्यानंतरच निवडणुकीचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हालचाली सुरु आहेत. उमेदवारांच्या चाचपणीला गती आली आहे. कोणाशी आणि कशी आघाडी केली, तर सभासद स्वीकारतील याबाबतचे गावागावातून उमटणारे तरंगही अनुभवले जात आहेत. कारखाना राजकारणातील पारंपारिक सत्तारुढ व विरोधकांसमोर अराजकीय तिसरा पर्याय देण्याचा विचार काही तरूणांमध्ये सुरू आहे. यामुळे कारखाना निवडणुकीचे रंग कोणते असतील याचा अंदाज आतापासूनच येत आहे. ब्रिस्क कंपनीकडून कारखाना ताब्यात घेतल्यानंतर आणि गळीत हंगाम सुरु करण्यापासून ते नंतरच्या कालावधीत तालुक्यात सुरु झालेला राजकीय ‘खेळ’ सभासदांनी चांगलाच अनुभवला आहे. या खेळामुळे भविष्यातील निवडणूक मैदानात कोणाच्या पदरात जय-पराजय पडणार, हे सभासदरुपी पंचांच्या हातात असणार आहे.
---------------
कोट
गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संस्था मतदारांच्या प्राप्त ठरावावरून तयार केलेली यादी कारखान्याला पाठविली आहे. सभासदांच्या याद्या मागविल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होईल.
- ए. व्ही. गाडे, प्रादेशिक सहसंचालक, साखर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61632 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top