सन्मानासाठीच जागा देत होतो : संजय राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सन्मानासाठीच जागा देत होतो : संजय राऊत
सन्मानासाठीच जागा देत होतो : संजय राऊत

सन्मानासाठीच जागा देत होतो : संजय राऊत

sakal_logo
By

संजय पवार आज अर्ज भरणार
---
मुख्यमंत्री उपस्थित राहणार; सन्मानासाठीच जागा देत होतो : राऊत
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २५ : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मी आणि संजय पवार उद्या (ता. २६) दुपारी एकला विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसह उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
‘‘राजर्षी शाहूंच्या घराण्याचा सन्मान राखण्याच्या हेतूनेच संभाजीराजेंना शिवसेनेच्या कोट्यातील जागा देण्याची तयारी शिवसेनेने केली होती, त्यापेक्षा शिवसेना काय करू शकते?’’ असा सवाल करीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. या भेटीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचं राऊत यांनी सांगितलंय. मात्र, नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. “शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. उद्या शिवसेनेचे माझ्यासह एकूण दोन उमेदवार राज्यसभेसाठी अर्ज भरत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार हेही अर्ज भरण्यासाठी येत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचे, देशाचे उत्तुंग नेतृत्व आहे. महाविकास आघाडी सरकारचे ते आधारस्तंभ आहेत. ते वडीलधारी आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्यासाठी गरजेचं होतं. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा झाली,” असं संजय राऊत म्हणाले.
राज्यसभेच्या रिंगणात अपक्ष म्हणून उतरलेले संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याऐवजी शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचे समर्थक व काही मराठा संघटनांमध्ये नाराजी आहे. ‘शिवसेनेला हे महाग पडेल’, शिवसेनेने गद्दारी केली असल्याचे इशारे दिले जात आहेत. हे इशारे देणाऱ्यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी खडे बोल सुनावले आहेत. संजय राऊत म्हणाले, ‘‘शिवसेनेने सहाव्या जागेसाठी उमेदवारी जाहीर करण्याचा आणि संभाजीराजेंच्या अपमानाचा काहीही संबंध नाही. हा विषय आमच्या दृष्टीनं संपलेला आहे. संभाजीराजे यांना शिवसेनेच्या कोट्यातून जागा द्यायला आम्ही तयार झालो होतो. त्यांचा आणि घराण्याचा सन्मान राखण्याचाच हेतू यामागे होता. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी ४२ मतांचा कोटा लागतो, त्यासाठी संभाजीराजेंना मदत करण्याची आमची तयारी होती. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? शिवसेनेने संजय पवार यांना मराठा महासंघाचे कार्यकर्ते म्हणून उमेदवारी दिली आहे.’’
ते म्हणाले, ‘‘राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा व पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून यावे, अशी आमची भूमिका होती आणि ती काही अट नव्हती. छत्रपतींच्या घराण्यातील कोणी राजकीय पक्षात जात नाही, हा त्यांच्या समर्थकांचा दावा चुकीचा आहे. देशातील अनेक घराणी कुठल्या ना कुठल्या पक्षात काम करून त्यांचं सामाजिक कार्य पुढं नेत असतात. शिवसेनेनं संभाजीराजेंना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याशी चर्चाही झाली होती. त्यांच्या समर्थकांनी १५ दिवसांतील घडामोडी समजून घेतल्या पाहिजेत.’’

कोट सीडी पान २ वरून

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61702 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top