जिल्हा बॅंकेच्या चंदगड शाखेचे एटीएम दोन महिन्यांपासून बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेच्या चंदगड शाखेचे एटीएम दोन महिन्यांपासून बंद
जिल्हा बॅंकेच्या चंदगड शाखेचे एटीएम दोन महिन्यांपासून बंद

जिल्हा बॅंकेच्या चंदगड शाखेचे एटीएम दोन महिन्यांपासून बंद

sakal_logo
By

24488
चंदगड ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या येथील शाखेचे एटीएम मशिन दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे.

जिल्हा बॅंकेच्या चंदगड शाखेचे
एटीएम दोन महिन्यांपासून बंद
चंदगड, ता. २६ ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या येथील शाखेकडील एटीएम मशिन दोन महिन्यांपासून बंद असल्याने ग्राहकांतून नाराजीच्या भावना आहेत. बॅंक प्रशासनाने तातडीने लक्ष घालून हे मशिन सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील सुमारे वीसहून अधिक गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या या बॅंकेचे शेकडो ग्राहक आहेत. शेतकऱ्यांची उसाची बिले याच बॅंकेत जमा होतात. त्याशिवाय दूध संस्थांची बिलेसुद्धा याच बॅंकेत जमा केली जातात. त्यामुळे गरजेसाठी ग्राहकांची बॅंकेत मोठी गर्दी होते. खात्यावरील पैसे काढण्यासाठी बॅंकेत रांग लावावी लागते. अशा वेळी एटीएम मशिनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होतो; शिवाय ग्राहकालाही वेळेत पैसे मिळतात. मोठ्या संख्येने ग्राहकांची गरज दुर्लक्षित करुन बॅंकेने या मशिनच्या दुरुस्तीबाबत दखल न घेतल्याने नाराजीच्या भावना आहेत. यासंदर्भात बॅंक प्रशासनाशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामांवर मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. हे मशिन बंद करण्याबाबत जिल्हा बॅंकेच्या मुख्य कार्यालयातून सूचना दिल्याचे सांगण्यात आले, मात्र ग्राहकांची गैरसोय विचारात घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले आहे. लवकरच हे मशिन सेवेत रुजू होईल, असे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61792 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top