
गव्याचे दर्शन
24490
चंदगड-हेरे मार्गावर
गव्याने मारला ठिय्या
चंदगड ः चंदगड- हेरे मार्गावर ताम्रपर्णी पुलाजवलळ मॉर्निंग वॉकरना गव्याचे दर्शन झाले. गवा कळपापासून भरकटल्याने काही वेळ त्याची तारांबळ उडाली. वातावरणाचा अंदाज घेत तो सबनीसांच्या शेताच्या दिशेने मार्गस्थ झाला. आज पहाटे माजी सरपंच अरुण पिळणकर व त्यांचे सहकारी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ताम्रपर्णी पुलापासून हाकेच्या अंतरावर अचानकपणे समोर उभा असलेला गवा दिसला. भले मोठे धूड पाहताच त्यांची पावलेही थबकली. सुमारे चार- पाच मिनिटे हा गवा स्तब्ध उभा होता. त्यानंतर त्याने दिशा निश्चित करून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पिळणकर यांनी धाडसाने गव्याला कॅमेरात कैद केले. पहाटेचे शांत वातावरण, रस्त्याच्या कडेला निवांत उभारलेला गवा. त्याच्या दिशेने रस्त्यावरुन टुणटुण उड्या मारत चाललेला कावळा आणि काही अंतरावर गेल्यावर पंख पसरुन गव्याच्या दिशने त्याने घेतलेली झेप. त्याचवेळी दिशा बदलून गव्यानेही जंगलाच्या दिशने ठोकलेली धूम असा हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. नागकिकांनी गव्यांचा वावर असलेल्या परीसरात सकाळच्या वेळी फिरताना खबरदारी घ्यावी असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61794 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..