आरोग्य सर्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सर्वे
आरोग्य सर्वे

आरोग्य सर्वे

sakal_logo
By

डेंगी डास फोटो

शहरात सात हॉटस्पॉट
----------
२२२ घरांतील नमुने दूषित; डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण सापडण्याची शक्यता; महापालिकेकडून सर्व्हे

उदयसिंग पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ ः मोरे-मानेनगर परिसरात आढळलेले डेंगीचे रुग्ण तसेच शहराच्या अन्य भागांत आढळलेल्या चिकनगुनियाच्या रुग्णांमुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा झाडून कामाला लागली आहे. मोरे-मानेनगरसह शहरात कसबा बावडा-लाईन बाजार, जवाहरनगर, नेहरूनगर, मंगेशकरनगर, विक्रमनगर, सीपीआरजवळील वस्तीत डेंगीचा उद्रेक होण्याची शक्यता असलेल्या सात ठिकाणांवर यंत्रणा लक्ष ठेवून आहे. मॉन्सूनपूर्व डास अळी सर्वेक्षण सुरूच असून रुग्ण आढळलेल्या परिसरात जादा कर्मचारी लावून सर्व्हे केला जात आहे. मे महिन्यात आतापर्यंत विविध ठिकाणचे ७०६५ घरांचे सर्वेक्षण केले असून त्यांत २२२ घरांमधील नमुने दूषित आढळले आहेत.
कोरोना काळापूर्वी शहरात ठिकठिकाणी डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण सापडले आहेत. जास्त रुग्ण संख्या असलेल्या ठिकाणी महापालिकेची आरोग्य यंत्रणा पोहचत होती.
त्यावेळी खासगीमधून रक्त तपासणी करून आल्यानंतर अहवाल आल्यानंतर यंत्रणा कामाला लागत होती. आता त्या प्रक्रियेत बदल केला असून महापालिकेच्या आरोग्य विभागाला रक्त तपासणीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे ज्या भागात संशयास्पद रुग्ण आढळतात तिथे महापालिकेची यंत्रणा रक्त तपासणी करत आहे. त्या परिसरातील रुग्ण तातडीने समजून परिस्थिती नियंत्रणात येत आहे.
दोन महिन्यांपूर्वी काही ठिकाणी रुग्ण आढळले. तिथे यंत्रणेने सर्व्हे केल्याने त्यात वाढ झाली नाही. आता मेमध्ये मोरे-मानेनगर परिसरात रुग्ण आढळले. या दोन्ही ठिकाणी केलेल्या सर्व्हेनंतर घरांतील फ्रीज, कुंड्या, करवंट्या तसेच अन्य साहित्यात साठलेल्या पाण्यात अळ्या वाढून डास निर्मिती झाली असण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. डास अळ्या तयार होऊ नयेत म्हणून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यात धूर फवारणी, औषध फवारणी, अळीनाशक तसेच गप्पी मासे सोडण्याचा समावेश आहे. जादा कर्मचारी मदतीला घेतले जात आहेत. मोरे-मानेनगरमध्ये १० नर्ससह २० आशा कर्मचारी सर्व्हे करत आहेत.

सात हॉटस्पॉट असे-
--
*मोरे-मानेनगर
*कसबा बावडा-लाईन बाजार
*जवाहरनगर
* नेहरूनगर
*मंगेशकरनगर
*विक्रमनगर
*सीपीआर परिसर

कोट
घरांमधील साहित्यात डास अळ्या सापडत असल्याने नागरिकांनी पाणी साठणारी ठिकाणे कोरडी करणे गरजेचे आहे. कर्मचारी सर्व्हे करत असून जिथे रुग्ण आढळतील तिथे धूर, औषध फवारणी करून साथ नियंत्रणात आणली जात आहे.
- डॉ. प्रकाश पावरा, आरोग्य अधिकारी, महापालिका.

येथे सर्व्हे..
*राजारामपुरी, *निकम पार्क, * गंजीमाळ, * पाटील गल्ली, *आंबे गल्ली (कसबा बावडा) * बागवान गल्ली-शनिवार पेठ * निर्माण चौक-पाडळकर वसाहत * भोई गल्ली-रविवार पेठ
*शाहू चौक-फुलेवाडी * शिवराई नगर- शिवगंगा कॉलनी * देवणे गल्ली-तस्ते गल्ली *सासने गल्ली-बुधवार पेठ * योगेश्‍वरी कॉलनी.
....................

स्वच्छतेचा अभाव
डेंगी स्वच्छ पाण्यात निर्माण होणारा डास असला तरी इतर डासांची पैदास होण्यास काही भागांतील स्वच्छतेचा अभाव कारणीभूत आहे. तुळजाभवानी कॉलनी परिसरातील गटारांची स्वच्छता झालेली नव्हती.

यंत्रणा किती
*हॅन्ड धूर फवारणी मशिन- १०
*वाहनावर लावलेले धूर फवारणी मशिन- ३
*औषध फवारणीसाठी स्प्रे पंप- ३०
*औषध फवारणी ट्रॅक्टर-२
*सर्व्हेसाठी ६ कर्मचाऱ्यांची दोन पथके
.................
मे मधील सर्वेक्षण असे-
*७०६५ घरांपैकी २२२ दूषित
*१६०१८ कंटेनरपैकी ३९६ दूषित.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61801 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top