शैक्षणिक गुणवत्तेत सुधारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक गुणवत्तेत सुधारण
शैक्षणिक गुणवत्तेत सुधारण

शैक्षणिक गुणवत्तेत सुधारण

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...

शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा
---
राष्‍ट्रीय स्‍तरावर सर्वेक्षण; पाचवी, आठवी, दहावीच्या वर्गांची प्रगती
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २६ : जिल्‍हा परिषदेच्या शाळांचे राष्‍ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले असून, कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे निष्‍कर्ष समोर आले आहेत. या सर्वेक्षणात २२९ शाळा, ८७० शिक्षक व तीन हजार ७४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातही यात ५३ टक्‍के मुले, तर ४७ टक्‍के मुलींचा समावेश होता. सहभागी शाळांमध्येही २६ टक्‍के शाळा या ग्रामीण, ३६ टक्‍के शाळा खासगी, तर ३७ टक्‍के शाळा या शासकीय अनुदानित होत्या. यातील दोन टक्‍के शाळा या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील होत्या.
संपादणूक सर्वेक्षण २०२१ मधील निकाल जाहीर झाले आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये असे सर्वेक्षण केले होते. या दोन वर्षांतील तुलना पाहता मागील चार वर्षांत चांगली प्रगती झाली आहे. देश व राज्याच्या तुलनेत जिल्‍ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गांत मोठी प्रगती केली आहे. या वर्गांच्या सर्व विषयांचा विचार करता इयत्ता तिसरीचा राज्यात पाचवा, पाचवीचा १३ वा, आठवीचा पहिला, तर दहावीच्या वर्गाचा या सरासरीत द्वितीय क्रमांक आहे. हे सर्वेक्षण १२ नोव्‍हेंबर २०२१ ला एकाच दिवसात घेण्यात आले.
२०१७ पेक्षा २०२१ मधील प्रगती सुधारली आहे. सर्वच वर्ग राज्यात नव्‍हेतर देशात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक आहे. शैक्षणिक परंपरा पाहता एकत्रित प्रयत्‍न केल्यास हे शक्य आहे. गुणवत्ता वाढीसाठी ज्यांनी प्रयत्‍न केले ते कौतुकास पात्र आहेत. ज्या विषयात तसेच वर्गाचे गुणांकन कमी झाले आहे, त्यांनी प्रयत्‍न करावेत.
- संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61887 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top