
मंत्री परब - कारवाई - शिवसेनेकडून निषेध
२४६४२
मंत्री परब यांच्यावर
कारवाईचा निषेध
शिवसेनेची ताराराणी चौकात निदर्शने
कोल्हापूर, ता. २६ : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मुंबईसह अन्यत्र इडीने आज सकाळी कारवाई केली. कारवाईचा शिवसेनेच्या वतीने ताराराणी चौकात जाहीर निषेध केला. ‘‘जय भवानी, जय शिवाजी’’, ‘‘ईडी की घरगडी’’, ‘सूडबुद्धीने होणाऱ्या कारवाईचा जाहीर निषेध’ अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.
केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून रडीचे राजकारण करत भाजप महाविकास आघाडीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीसह खासकरून शिवसेनेच्या नेत्यांना भाजपच्या केंद्रीय तपास यंत्रणेकडून टार्गेट केले जात आहे. परंतु अंगावर आले की शिंगावर घेण्याची शिकवण ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, कितीही आक्रमणे झाली तरी शिवसेना नमणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.
सूडबुद्धीने होणारी कारवाई जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. महागाई, दरवाढ, रोजगार यावर कोणताही भाजप नेता बोलताना दिसत नाही. जनता दूधखुळी नसून भाजपचा ‘हम करे सो कायदा’ आता जनताच मोडून काढेल. त्यामुळे भाजप पुरस्कृत कारवाया तातडीने थांबवाव्यात अन्यथा येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत भाजप केंद्र व राज्यातून पायउतार झालेली दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, नंदकुमार मोरे, रवीभाऊ चौगुले, सुजित चव्हाण, दीपक गौड, किशोर घाटगे, रघुनाथ टिपुगडे, हर्षल सुर्वे, रियाज बागवान, मंजीत माने, राजू यादव, महिला आघाडीच्या स्मिता सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61941 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..