आजरा ः टस्कर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कर बातमी
आजरा ः टस्कर बातमी

आजरा ः टस्कर बातमी

sakal_logo
By

24667
आजरा : आजरा-गडहिंग्लज मार्गावर आलेला टस्कर.

टस्कर बिथरल्याने
वाहनधारकांची भंबेरी
आजरा-गडहिंग्लज मार्गावर प्रकार; जोरदार चित्काराने भीती
आजरा, ता. २६ : आजरा-गडहिंग्लज मार्गावर मसोबा देवालयाजवळ आज सायंकाळी साडेपाच वाजता टस्कर रस्त्यावर आला. त्याला पाहण्यासाठी वाहनधारकांची गर्दी जमली होती. गर्दी पाहताच टस्कर बिथरला व त्याने जोरदार चित्कार ठोकला. त्याच्या रुद्रावताराने वाहनधारकांची भंबेरी उडाली. त्याने तेथील एका झाडाची फांदी मोडून रस्त्यावर टाकली व तो परत जंगलात गेला.
दररोज टस्कर सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सुलगावच्या राजाराम टेकडीकडून आजरा-गडहिंग्लज मार्ग ओलांडून हिरण्यकेशी नदीकडे जातो. नदीत पाणी पिण्यासाठी व डुंबण्यासाठी जात असावा. आजदेखील तो याच मार्गावरून नदीकडे चालला होता. तो रस्त्याजवळ येताच वाहनधारकांनी गर्दी केल्याने टस्कर बिथरला त्याने मोठा चित्कार ठोकला. जवळील झाडाची फांदी मोडून रस्त्यावर टाकली. त्याचा अवतार पाहताच वाहनधारक व बघ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, टस्करही परत फिरला व जंगलात निघून गेला. त्याच्या रुद्रावताराची चर्चा घटनास्थळी होती.

टस्कराला त्रास देऊ नका
टस्कर रस्त्यावर उतरून तो शांतपणे नदीकडे जातो. अशा काळात वाहनधारकांनी रस्त्यावर येवून त्याला कसलाही त्रास होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

24490
चंदगड-हेरे मार्गावर
गव्याने मारला ठिय्या
चंदगड ः चंदगड-हेरे मार्गावर ताम्रपर्णी पुलाजवलळ मॉर्निंग वॉकरना गव्याचे दर्शन झाले. गवा कळपापासून भरकटल्याने काही वेळ त्याची तारांबळ उडाली. वातावरणाचा अंदाज घेत तो सबनीसांच्या शेताच्या दिशेने मार्गस्थ झाला. आज पहाटे माजी सरपंच अरुण पिळणकर व त्यांचे सहकारी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ताम्रपर्णी पुलापासून हाकेच्या अंतरावर अचानकपणे समोर उभा असलेला गवा दिसला. भले मोठे धूड पाहताच त्यांची पावलेही थबकली. सुमारे चार-पाच मिनिटे हा गवा स्तब्ध उभा होता. त्यानंतर त्याने दिशा निश्चित करून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. पिळणकर यांनी धाडसाने गव्याला कॅमेरात कैद केले. पहाटेचे शांत वातावरण, रस्त्याच्या कडेला निवांत उभारलेला गवा. त्याच्या दिशेने रस्त्यावरून टुणटुण उड्या मारत चाललेला कावळा आणि काही अंतरावर गेल्यावर पंख पसरून गव्याच्या दिशने त्याने घेतलेली झेप. त्याचवेळी दिशा बदलून गव्यानेही जंगलाच्या दिशने ठोकलेली धूम असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61969 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top