कळे: चव्हाटा दूध संस्थेचे उद्घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळे: चव्हाटा दूध संस्थेचे उद्घाटन
कळे: चव्हाटा दूध संस्थेचे उद्घाटन

कळे: चव्हाटा दूध संस्थेचे उद्घाटन

sakal_logo
By

2606

एव्हरेस्टवीर कस्तुरीला
‘गोशिमा’कडून आर्थिक मदत
उजळाईवाडी ः जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या कस्तुरी सावेकरला पुढील वाटचालीसाठी २१ हजारांची आर्थिक मदत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दिली. जिद्दीच्या जोरावर एव्हरेस्टवर भारताचा तिरंगा व करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकवला. जिगरबाज कस्तुरीला पुढील भावी वाटचालीसाठी गोशिमाच्या वतीने २१ हजार रुपये धनादेश ‘गोशिमा’चे संचालक सुरजितसिंग पवार यांच्या हस्ते दीपक सावेकर यांना प्रदान केला. मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, खजिनदार स्वरूप कदम, संचालक लक्ष्मीदास पटेल, निमंत्रित संचालक शिवाजीराव सुतार, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर उपस्थित होते.

02528
चव्हाटा दूध संस्थेचे उद्‍घाटन
कळे : येथे श्री चव्हाटा सहकारी दूध संस्थेचे उद्‍घाटन ग्रामपंचायत माजी सदस्य संभाजी दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष नामदेव जाधव, नीलेश जाधव, विक्रम जाधव, पांडुरंग जाधव, गणेश पाटील, बापूसाहेब पाटील, पांडुरंग पाटील, अर्जुन पाटील, ज्ञानू चव्हाण, जयसिंग जाधव, रामचंद्र जाधव, बाबासाहेब जाधव, रंगराव मोळे, सौरभ सुतार, संजय गांधी-पाटील, आण्णा डांगे, ओंकार जाधव, अशोक जाधव, विनायक जाधव, कृष्णात मोळे, पिंटू जाधव, सदाशिव मोळे, सागर जाधव, बाबाजी पाटील आदी उपस्थित होते. सचिव श्रीधर जाधव यांनी आभार मानले. ''दूध उत्पादकांच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला देऊ.’ असे प्रतिपादन अध्यक्ष नामदेव शंकर जाधव यांनी केले.

१०७८, १०७७
बळवंत पाटील अध्यक्षपदी
सोनाळी ः येथील धाकेश्वर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत रामचंद्र पाटील, तर उपाध्यक्षपदी गीता ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी प्रथमेश हारूगले होते. संचालक असे : प्रकाश पाटील, तुकाराम मोरे, नामदेव पाटील, आदिनाथ चौगले, मधुकर पाटील, साताप्पा मोरे, सुरेश पाटील, जयसिंग सोनाळकर, कमल मोरे, माजी आमदार संपतराव पवार पाटील, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्वागत सचिव दतात्रय पाटील, आभार रघुनाथ खराडे यांनी मानले.

२९३३
‘एमबीए’नंतर करिअरवर कार्यशाळा
वारणानगर ः एमबीएनंतर विद्यार्थ्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या संधी विविध ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी माहिती वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एमबीए विभागप्रमुख डॉ. सागर सुतार यांनी दिली. येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये ‘एमबीए नंतरच्या करिअर संधी’ या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. प्रा. रोहित बसनाईक यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले, ‘‘२१ व्या शतकात व्यवस्थापन ही काळाची गरज आहे, आज प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन ही एक कला असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनातील पदवीचे शिक्षण आणि ज्ञान आत्मसात केले पाहिजे. प्रा. प्रवीण सातवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली हिरवे यांनी संयोजन साहाय्य केले. डॉ. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

३६१५
कोनवडेत उन्हाळी शिबिराची सांगता
कोनवडे ः येथील अभिनव ॲकॅडमीमध्ये समर कॅम्प सांगता व गुणगौरव सोहळा विठ्ठल मंदिरात झाला. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास देवराज बारदेस्कर, रवी कामत, संजय पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, समाधान मोरे, यशवंत पाटील, एम. पी पाटील प्रमुख उपस्थित होते. विद्यार्थ्यानी कला सादर केल्या. खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. प्रास्ताविक संस्थापक योगेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक सुतार यांनी केले. आभार प्रदीप पाटील यांनी मानले. या वेळी विद्यार्थी माता, पालक, शिक्षक, राहुल गुरव, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62006 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top