शिक्षण मंडळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण मंडळ
शिक्षण मंडळ

शिक्षण मंडळ

sakal_logo
By

पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके, गणवेश
---
प्राथमिक शिक्षण मंडळाकडून नियोजन; १३ जूनला शाळा सुरू होणार
कोल्हापूर, ता. २७ ः कोरोनाच्या निर्बंधानंतर दोन वर्षांनंतर १३ जूनला शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शाळांतील ४३ हजार ३३४ विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यासाठी एक लाख ६१ हजार ८४७ पुस्तके आली आहेत. त्यातील एक लाख ४५ हजार ६६२ पुस्तकांचे शाळांना वितरणही झाले. याचबरोबर महापालिकेच्या ५८ शाळांमधील सहा हजार ७०० विद्यार्थ्यांना गणवेशही दिला जाणार आहे.
शहरातील महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. दोन वर्षांच्या ब्रेकनंतर शाळा १३ जूनला सुरू करण्याचे नियोजन आहे. शासनस्तरावरून त्यासाठी तयारी केली असून, पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. त्यासाठी एक लाख ८९ हजार पुस्तकांची मागणी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाने नोंदवली होती. त्यानुसार एक लाख ६१ हजार ८४७ पुस्तके आली आहेत. शहरातील १८९ शाळांना देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत एक लाख ४५ हजार ६६२ पुस्तकांचे वितरण केले आहे.
याबरोबरच महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दोन मोफत गणवेश दिले जातात. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईमार्फत त्यासाठीचा निधी दिला जातो. त्याकरिता केंद्र व राज्याकडून निधी येतो. यंदा प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्यात यावेत, असे पत्र शिक्षण मंडळाला आले आहे. त्यासाठी किमान ४० लाखांचा निधी येतो. तो शिक्षण मंडळाकडून शाळा व्यवस्थापन समितीला दिला जातो. त्यांनी गणवेश द्यायचे असतात. त्याच्या मंजुरीची फाईल प्रशासकांकडे पाठविण्यात आली आहे. महापालिकेच्या शाळांमधील सहा हजार ७०० विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातील.

कोट
पहिल्या दिवशी महापालिकेच्या तसेच खासगी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जाणार आहेत. तसेच, गणवेश वाटपासाठीही प्रयत्न केले जातात. यंदा सुरू होणारे सत्र व्यवस्थित सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
- डी. सी. कुंभार, प्रशासनाधिकारी,
प्राथमिक शिक्षण मंडळ, महापालिका

चौकट
निधी वितरणाची अडचण
सध्या शासनाकडून पीएफएमएस प्रणालीतून निधी येत असतो. शहरातील शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी पाठविण्यासाठी त्या प्रणालीत वॉर्ड हा पर्याय नाही. त्यामुळे तो निधी समितीकडे वर्ग करण्यास अडचण आली आहे. यासाठी परिषदेकडे पत्रव्यवहार केला. त्यावर मार्ग निघणार आहे.

एकूण पुस्तक मागणी- १,८९,०००
लाभार्थी विद्यार्थी- ४३,३३४
प्राप्त पुस्तके- १,६१,८४७
वाटप पुस्तके- १,४५,६६२
पुस्तके येणार- २१,३४२


मनपा शाळेतील यांना मिळणार गणवेश ः
सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले, दारिद्र्यरेषेखालील मुले

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62128 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top