पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलणार
पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलणार

पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलणार

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून....(सकाळ बातमीचा परिणाम)

पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलणार

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २७ : जिल्‍हा परिषदेच्या पशुसंवर्धन दवाखान्यांच्या वेळांमध्ये तात्‍काळ बदल करावा, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी दिले. पशुसंवर्धन समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीतच ‘सकाळ’मधून प्रसिध्‍द करण्यात आलेल्या ‘जनावरं दवाखान्यात, डॉक्‍टर घरात’ या वृत्ताची दखल घेण्यात आली. जनावरांच्या उपचारांसाठी पशुवैद्यकीय विभाग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यात काय निर्णय व्‍हायचा तेव्‍हा होईल, जिल्‍ह्यात मात्र तात्‍काळ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदला, असे आदेश त्यांनी दिले.
जिल्‍हा परिषद; तसेच पशुसंवर्धन उपायुक्‍त कार्यालयाकडून जिल्‍ह्याच्या कानाकोपऱ्यात दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मात्र या दवाखान्यांच्या वेळा गैरसोयीच्या असल्याने पशुपालकांची मोठी अडचण होत आहे. सकाळी लवकर जनावरांना चरायला नेले जाते. जनावरे चरायला गेल्यानंतर गावात पशुवैद्यकीय डॉक्‍टर येतात, तर ही जनावरे घरी परतण्यापूर्वी डॉक्‍टर घरी जातात, अशी परिस्‍थिती आहे. या काळात जनावरांना काही त्रास सुरू झाला, आजारी पडली तर खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. दुर्गम भागत तर महिनोन्‌महिने हे डॉक्‍टर गावात आणि वाड्या-वस्त्यांवर जात नाहीत. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. याबाबत ‘सकाळ’ने दोनच दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल आज झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत घेत पशुसंवर्धन दवाखान्यांचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

....
कोट
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आजच पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत दवाखान्यांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या वेळा या शेतकरी व पशुपालकांना उपयोगी ठरत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत ‘सकाळ’ने वृत्तही प्रसिद्ध केले आहे. याची दखल घेत या वेळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पशुसंवर्धन कर्मचारी संघटनांनीही त्यास मान्यता दिली आहे. आठवड्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलण्याबाबत निर्णय होईल.
- डॉ. विनोद पवार, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62185 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top