धाकेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील, उपाध्यक्ष पदी गिता पाटील. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धाकेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील, उपाध्यक्ष पदी गिता पाटील.
धाकेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील, उपाध्यक्ष पदी गिता पाटील.

धाकेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत पाटील, उपाध्यक्ष पदी गिता पाटील.

sakal_logo
By

सोनाळी ता. २७.
सोनाळी ( ता. करवीर ) येथील धाकेश्वर विकास सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बळवंत रामचंद्र पाटील ,तर उपाध्यक्षपदी गिता ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी प्रथमेश हारूगले होते. यावेळी संचालक प्रकाश शामराव पाटील,तुकाराम सदाशिव मोरे, नामदेव शामराव पाटील,आदिनाथ पांडूरंग चौगले,मधूकर बापू पाटील,साताप्पा मारूती मोरे,सुरेश बाबूराव पाटील,जयसिंग गणपती सोनाळकर,कमल बाळासो मोरे,संचालक सभासद,कर्मचारी आदी उपस्थित होते.याकामी माजी आमदार संपतराव पवार पाटील,भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, स्वागत सचिव दतात्रय पाटील,आभार रघूनाथ ख्रराडे यांनी मानले.

उजळाईवाडी ता. २६

जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट वर १४ मे ला यशस्वी चढाई करणाऱ्या कस्तुरी सावेकर तिला पुढील वाटचालीसाठी २१ हजारांची आर्थिक मदत गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने गोशिमा कार्यालय गोकुळ शिरगाव येथे देण्यात आली. घरची प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्दीच्या जोरावर २९०२९ फूट उंचीवर भारताचा तिरंगा व करवीर नगरीचा भगवा ध्वज फडकवला. तिच्या या कार्याचे सर्व सदस्यांनी कौतुक केले. या जिगरबाज कस्तुरीला पुढील भावी वाटचाल यशस्वी करण्यासाठी गोशिमाच्या वतीने २१ हजार रुपये धनादेश गोशिमा चे संचालक सुरजितसिंग पवार यांचे हस्ते दिपक सावेकर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी गोशिमाचे मानद सचिव नितीनचंद्र दळवाई, खजिनदार स्वरूप कदम, संचालक लक्ष्मीदास पटेल,निमंत्रित संचालक शिवाजीराव सुतार, रामचंद्र लोहार, नचिकेत कुंभोजकर उपस्थित होते.

फोटो ओळ
गोकुळ शिरगाव येथे एव्हरेस्टवीर करवीर कन्या कस्तुरी सावेकर हिच्या वडिलांना आर्थिक मदतीचा धनादेश देताना सुरजितसिंग पवार नितीनचंद्र दळवाई स्वरूप कदम व इतर

शिरोळ ता २६
शिरोळ तालुक्यासाठी, शिरोळ येथे मंजूर झालेल्या क्रीडा संकुला बाबत , या क्रीडा संकुलाच्या जागेबाबत सर्व विभागाचे अभिप्राय घेऊन ,तातडीने प्रस्ताव सादर करावा. जागेचा ताबा आगाऊ देणेबाबत शक्यता पडताळून पाहाव्यात तसेच कोल्हापूर जिल्हा अधिकारी यांनी जागा ताब्यात देणेबाबत, तातडीने कार्यवाही करावी असे आदेश क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी बैठकीत दिले.
मंत्री सुनील केदार , आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, यांची मंत्रालयात बैठक झाली.
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा संकुल बाबतचा प्रस्ताव सत्वर सादर करावा असेही मंत्री केदार यांनी यावेळी बैठकीस उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निर्देश दिले असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
शिरोळ येथील क्रीडा संकुलासाठी लागणारा निधी मंजूर झालेला आहे.
शिरोळ हे तालुक्याचे मुख्य आणि मध्यवर्ती ठिकाण असलेने, येथे क्रीडा संकुल उभारले जावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता. क्रीडा संकुलासाठी आवश्यक असणारी ५ एकर जागा शिरोळ मध्ये उपलब्ध होऊन मिळाली आहे.पण क्रीडा संकुलासाठी मंजूर असलेल्या जागेमध्ये पोलीस प्रशिक्षण रनिंग साठी आवश्यक असणारी चारशे मीटरची धावपट्टी करता येत नव्हती. त्यासाठी वाढीव २ एकर जमिनीची आवश्यकता होती. याबाबत देखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीस शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील, कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. साखरे, शिरोळ चे मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी
वारणानगर: येथील वारणा महाविद्यालयामध्येन डॉ सागर सुतार यांचे संदर्भ ग्रंथ भेट देऊन सत्कार करताना प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. सी. आर. जाधव, प्रा.आर. बी. बसनाईक.
---
वारणानगर, ता.२५:"एम. बी. ए. पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये एच.आर.ए., वित्तीय विश्लेषक, व्यवस्थापन व्यवस्थापक, विपणन व्यवस्थापक अशा विविध नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत." अशी माहिती वाठार येथील अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एमबीएचे विभागप्रमुख डॉ. सागर सुतार यांनी दिली.
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये वाणिज्य विभागाच्यावतीने "एम.बी.ए. नंतरच्या करियर संधी" या विषयावरती कार्यशाळा झाली. यावेळी डॉ. सुतार बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.प्रकाश चिकुर्डेकर होते.
वाणिज्य विभागप्रमुख प्रा. रोहित बसनाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले,"आजच्या २१ व्या शतकामध्ये व्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे, आज प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. व्यवस्थापन ही एक कला असून त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनातील पदवीचे शिक्षण आणि ज्ञान आत्मसात केले पाहिजे."
प्रा. प्रवीण सातवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली हिरवे यांनी संयोजन सहाय्य केले.आभार डॉ. चंद्रकांत जाधव यांनी मानले.
---


कोनवडे, ता. २४ :
येथील अभिनव अकॅडमीमध्ये समर कॅम्प सांगता व गुणगौरव सोहळा विठ्ठल मंदिर येथे झाला.
दिपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास देवराज बारदेस्कर, रवी कामत, संजय पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, समाधान मोरे, यशवंत पाटील, एम. पी पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यानी कला सादर केल्या. खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देवून गौरविले. प्रास्ताविक संस्थापक योगेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दीपक सुतार यांनी केले. आभार प्रदीप पाटील यांनी मानले. यावेळी विद्यार्थी माता, पालक, शिक्षक, राहुल गुरव, ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.
---
फोटो : got2411.jpg
कोनवडे : (ता. भुदरगड) येथे अभिनव अकॅडमीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62186 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top