इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवा : शेवाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवा : शेवाळे
इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवा : शेवाळे

इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवा : शेवाळे

sakal_logo
By

24824
इचलकरंजी : शिवसंपर्क अभियानवेळी बोलतांना खासदार राहूल शेवाळे, व्यासपिठावर उपस्थीत महादेव गौड, रविंद्र माने, मुरलीधर जाधव आदी.

इचलकरंजी महापालिकेवर
भगवा फडकवा : शेवाळे
इचलकरंजी, ता. २७ : राज्य शासनाने इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केले आहे. त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणूकीत इचलकरंजी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी आजपासूनच तयारीला लागा, असे आवाहन खासदार राहूल शेवाळे यांनी केले. येथील कलानगर परिसरात शिवसेनेतर्फे शिवसंपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते. या वेळी खासदार शेवाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते.
खासदार शेवाळे म्हणाले, ‘‘शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अनेक जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनता ठामपणे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठिशी राहत आहे. राज्य शासनाने घेतलेले अनेक महत्वाचे निर्णय जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे.’’
या वेळी उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, स्थानिक लोकाधिकार समितीचे शिवाजी डोंगरे, श्रीकांत गावकर, तालुकाप्रमुख आनंद शेट्टी, शहरप्रमुख सयाजी चव्हाण, बाळासाहेब वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रंसगी महेश बोहरा, धनाजी मोरे, मलकारी लवटे, रविंद्र माने, भाऊसाहेब आवळे, उमा गौड, शिवाजी पाटील, ऋषिकेश गौड, दिव्या बडवे, मंगल चव्हाण, मंगल मुसळे, दिनकर अनुसे, विजय जोशी, बाळासो मधाळे, विद्याधर पवार, राजू मोकाशी, अजय घाडगे, मनोज भाट, भरत शिवलिंगे, राजू आरगे, बसया स्वामी, लक्ष्मण पाटील, संतोष गौड, गणेश जंगटे, संजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62201 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top