अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे आंदोलन
अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे आंदोलन

अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे आंदोलन

sakal_logo
By

अपंग बेरोजगार व पुनर्वसनतर्फे
सहा जूनपासून ठिय्या आंदोलन
कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील अपंग बेरोजगार व पुनर्वसन संस्थेतर्फे सहा जूनपासून जिल्ह्यातील अपंगांचे बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सचिव संजय पोवार यांनी पत्रकाद्वारे दिली. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी हे आंदोलन केले जाईल. अपंगांना संजय गांधी योजनेच्या अनुदानासाठी २५ वर्षे मुलांची आणि उत्पन्नाची अट रद्द झाली पाहिजे, शासकीय नोकरी नसणाऱ्या सर्व बेरोजगार अपंगांना संजय गांधी योजनेतून मासिक तीन हजार विनाअट अनुदान मिळाले पाहिजे, अपंगांना कोणत्याही योजनेसाठी अथवा सवलतीसाठी उत्पन्नाची आणि नातेवाईकांची अट असता कामा नये, अपंगांना अंत्योदय योजनेचे ३५ किलो धान्य मिळाले पाहिजे, अशा मागण्या केल्या जातील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62222 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top