गुफा, फिजिक जिमची विजयी सलामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुफा, फिजिक जिमची विजयी सलामी
गुफा, फिजिक जिमची विजयी सलामी

गुफा, फिजिक जिमची विजयी सलामी

sakal_logo
By

24865
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट लिगचे फुटबॉलला किक मारून उदघाटन करताना दीग्विजय कुराडे. सोबत मल्लिकार्जून बेल्लद, सुरेश संकेश्र्वरी, सुनिल चौगुले, राजेंद्र मांडेकर, बसवराज आजरी आदी. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)

गुफा, फिजिक जिमची विजयी सलामी
शिवराज युनायटेड लिग : युनायटेड रायझिंगची आगेकूच
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : य़ेथील गडहिंग्लज यूनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लिगला उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी गुफा गार्डियन्स, फिजिक जिम वॉरियर्स आणि युनायटेड रायझिंग स्टार्सने प्रतिस्पर्ध्यांना हरवून विजयी सलामी दिली. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही शिवराज युनायटेड डेव्हलमेंन्ट लिग सुरु आहे.
सायंकाळी चार वाजता शिवराज विद्या संकुलाचे संचालक दीग्विजय कुराडे यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खेळाडू डॉ सुरेश संकेश्र्वरी होते. स्पर्धा समन्वयक महेश सुतार यांनी स्वागत केले. सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, संचालक सुनिल चौगुले, राजेंद्र मांडेकर, बसवराज आजरी, विश्वजीत कुराडे उपस्थित होते. ओमकार सुतार याने आभार मानले. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.
पहिल्या सामन्यात फिजिक जिम वॉरियर्सने कर्णधार सिध्दार्थ दड्डीकरच्या गोलमुळे संघर्ष फायटर्सला पराजित केले. संघर्षच्या शुभम कागिनकर, सुरज हनिमनाळे यांची झूंज व्यर्थ ठऱली. दुसऱ्या सामन्यात युनायटेड रायझिंग स्टार्सने इफा लायन्सवर 3-1 अशी मात केली. युनायटेडच्या विश्वजीत बिलावरने गोलचे खाते खोलले. मध्यतरानंतर य़श वधेवरा, श्रवण जाधव यांनी गोल करून विजय निश्चत केला. इफाचा सौरभ मक्क्षीचा गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही.
तिसऱ्या सामन्यात गुफा गार्डीयन्सने दादा जीएम चेलजर्संला 2-1 असे हरविले. गुफा गार्डीयन्सच्या महेश पोवारने पुर्वार्धात तर कर्णधार अभिषेक पोवारने उत्तरार्धात गोल करुन संघाच्या विजयाकडे वाटचाल गतिमान केली. दादा जीएमच्या अब्दूल कोचरगीने गोल करून सामना रोमाचंक केला. सामन्यासाठी सुरज कोंडूस्कर, रोहित कांबळे, निखिल तेली, सुल्तान शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62283 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top