कुंभोजमध्ये अनेक कामे प्रलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोजमध्ये अनेक कामे प्रलंबित
कुंभोजमध्ये अनेक कामे प्रलंबित

कुंभोजमध्ये अनेक कामे प्रलंबित

sakal_logo
By

कुंभोजमध्ये अनेक कामे प्रलंबित
ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून तत्काळ मार्गी लावण्याची मागणी
राजू मुजावर ः सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. २९ ः येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र होय. या आरोग्य केंद्राचे फर्निचर, संरक्षक भिंत, रस्ते व गटार बांधकाम आदी कामे प्रलंबित आहेत. घनकचरा प्रकल्प, ग्रामसचिवालय आदी कामेही रेंगाळली आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
कुंभोज-बाहुबली रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज वसाहतीमध्ये प्रवीण यादव यांच्या प्रयत्नातून ‘जिल्हा नियोजन’मधून २ कोटी ८७ लाख ५२ हजारांचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले आहे; मात्र इमारतीमधील फर्निचर, संरक्षक भिंत, रस्ते, गटर बांधकाम आदी कामे प्रलंबित आहेत. घनकचरा प्रकल्पासाठी निधी मंजूर आहे. मात्र या प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निकाली लावण्यास अद्याप ग्रामपंचायत सदस्यांना यश आले नाही. त्यामुळे गावचा कचरा संकलन करणारी घंटागाडी बंद आहे. येथील ग्रामसचिवालयाचे बांधकाम वर्षभर कासवगतीने सुरू होते. सद्यःस्थितीत तेही काम अनेक महिने बंदच आहे. ग्रामपंचायतीने या कामांचा पाठपुरावा करून ही कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
-------------
ग्रामसचिवालयासाठी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. हे काम लवकरच सुरू होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘जिल्हा नियोजन’मधून १ कोटी १० लाखांचा निधी मिळणार आहे. तो मिळाल्यानंतर उर्वरित कामे होतील. घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सदस्यांची बैठक बोलावली आहे.
-किरण माळी, गटनेते

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62350 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top