शिकार वाढती प्रकरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिकार वाढती प्रकरणे
शिकार वाढती प्रकरणे

शिकार वाढती प्रकरणे

sakal_logo
By

बेकायदा शस्त्रांचा वन्यजीवांसह समाजालाही धोका
---
वाढत्या शिकारींना पायबंद घालण्याचे वनविभागासमोर आव्हान

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः काळात थंडावलेल्या शिकारीच्या प्रकारांनी पुन्हा डोकेवर काढले आहे. अशा घटनात बेकायदेशीर बंदूक किंवा अन्य हत्यारांचा तसेच समाजमाध्यमातील टिप्सचा वापर होत असल्याचे उघड होत आहे. शाहूवाडी तालुक्यात उघडकीस आलेल्या एका प्रकरणात संशयिताने स्वतः बंदूक तयार केल्याची कबुली दिल्याने वनविभाग चक्रावला आहे. स्वतःच बंदूक बनविण्याचा प्रकार भविष्यात केवळ वन्यजीवांची शिकारीसाठीच नव्हे तर सामाजिक दहशतीसाठीही धोकादायक ठरू शकतो. अशा प्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी वनविभागासह पोलिस व जिल्हा प्रशासनानेही यात लक्ष घालण्याची गरज आहे.
शाहूवाडी तालुक्यात झालेल्या कारवाईत पाच संशयितांना वनविभागाने अटक केली. त्यांच्याकडून वन्यजीवांची शिकार केल्याचा प्रकार घडला. संशयितांकडून माहिती घेण्याचे काम वनविभाग करत आहे. एका संशयिताने बंदूक स्वतः तयार केल्याचे सांगितले. तर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातांकडून काडतुसे मिळविल्याचेही त्याने सांगितले. बंदूक बनवणारा संशयित शिक्षित आहे. तो स्मार्टफोन हाताळणारा आहे. त्याच्याकडे असलेल्या दुचाकी गाड्याही कुठून आणल्या? याचाही शोध सुरू आहे. काही महिन्यापूर्वी आजरा भागात वनविभागाने केलेल्या कारवाईत चार सुशिक्षित तरुण संशयित म्हणून सापडले होते. त्यांनी खवले मांजराच्या तस्करीसाठी बाजारपेठेच्या टिप्सही समाजमाध्यमातून मिळविल्याचे तपासात समोर आले होते. आणखी एका गुन्‍ह्यात साप पकडून त्याच्याशी खेळ करत व्हिडीओ बनवणे ते समाजमाध्यमावर टाकून त्यातून लोकप्रियता मिळवली. त्या आधारे कोणी साप पकडायला बोलवले की, साप पकडून त्याचे विष काढण्याचा प्रयत्न करणे असाही प्रकार उघडकीस आणला होता. कोल्हापूर, सांगली, कोकण सीमेवर झालेल्या कारवाईत एकूण चार प्रकरणांत गावठी बंदुका तसेच विनापरवाना शस्त्राने शिकारीचा प्रयत्न करणे, शिकार करणे अशा घटना आढळल्या. तर तीन प्रकरणात परवाना असलेल्या बंदुकीचा वापरही झाला. अशा प्रकरणांना आवर घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दृष्टिक्षेपात
*वर्षभरात १० ठिकाणी शिकारीच्या कारवाया उघड
*जवळपास १६ हून अधिक संशयित ताब्यात
*खवले मांजराची तस्करी उघड
*सापाचा व्हिडीओ करून व्हायरल

कोट
वन्यजीवांची शिकार करणे किंवा त्याला इजा पोहोचविणे वन कायद्यानुसार गुन्हा आहे. अशा गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. काही वन गुन्ह्यात संशयितांनी बेकायदेशीर शस्त्रे वापरली तर काही गुन्ह्यांत परवाना असलेली बंदूक वापरली, असेही घडले आहे. समाजमाध्यमातून मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन वन गुन्हे करण्याचा प्रकार दिसतो. या दोन्ही बाबी वन्यजीवांबरोबर समाजासाठीही घातक आहेत. अशा प्रकारांना चौकशी करून पायबंद घालण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील आहे.
- सुनील निकम, साहाय्यक उप वनसंरक्षक.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62480 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top