निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

२४९९८
डॉ. चांगदेव शिंदे
कोल्हापूर : सदर बाजार येथील डॉ. चांगदेव ऊर्फ चंद्रकांत जनार्दन शिंदे (वय ६३) यांचे चारधाम यात्रा करत असताना हृदयविकाराने निधन झाले. कुसबावडे जरंडी (ता. खानापूर, जि. सांगली) हे त्यांचे मूळ गाव. त्यांनी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडे ३४ वर्षे विविध पदावर सेवा बजावून निवृत्त झाले. चारधाम यात्रेस गेले असता रुद्रप्रयाग (उत्तराखंड) येथे त्यांचे निधन झाले. पालिकेच्या सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ. शकुंतला मेंगाने यांचे ते पती होत. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२४९९९
पद्माकर पाटील
कोल्हापूर : सडोली खालसा येथील पद्माकर दत्तात्रय पाटील ऊर्फ (आर. डी. पाटील-सडोलीकर) (वय ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

२३०५
श्रीपती अतिग्रे
माजगाव ः पडळ (ता. पन्हाळा) येथील श्रीपती भाऊ अतिग्रे (वय ८५) यांचे निधन झाले. कन्या हायस्कूल खुपिरेचे शिक्षक दिलीप अतिग्रे यांचे ते वडील होत. रक्षाविसजन रविवारी ता. २९ रोजी सकाळी ८ वाजता आहे.

२९५५
महादेव गुरव
पुनाळ : माजनाळ (ता. पन्हाळा) येथील महादेव आबाजी गुरव (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. २९) आहे.

२६४६
कृष्णात एकल
मुरगूड ः चिमगाव (ता. कागल) येथील कृष्णात धोंडी एकल (वय ८४) यांचे निधन झाले. साताप्पा पाटील येवतीकर यांचे ते सासरे व पोलिस कॉन्स्टेबल स्वप्‍नील पाटील यांचे ते आजोबा होत. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

२७१३
नागू चव्हाण
उत्तूर ः चव्हाणवाडी (ता. आजरा) येथील नागू चाळू चव्हाण (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

२३०२
धनाजी गायकवाड
माजगाव ः पडळ (ता. पन्हाळा) येथील तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष धनाजी रामचंद्र गायकवाड (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

१६५९
बायाक्का पाटील
शिरोली दुमाला : सडोली दुमाला (ता. करवीर) येथील बायाक्का सदाशिव पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. माध्यमिक विद्यालय सावर्डे-सडोलीचे मुख्याध्यापक सी. एस. पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

००११२
हिराबाई साजणे
नंदगाव : येथील श्रीमती हिराबाई कृष्णा साजणे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, दोन मुली व नातवंडे परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

२५००२
श्रीकांत जंगले
कोल्हापूर : कोते (ता. राधानगरी) येथील श्रीकांत तुकाराम जंगले (वय ५१) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

१६४१
सुंदा गदाळे
पेठवडगाव : यादव कॉलनीतील सुनंदा कृष्णात गदाळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

फोटो : 25018

मधुकर जगताप
कोल्हापूर : कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील मधुकर उर्फ गोपाळराव रामचंद्र जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : 25020

सिंधुताई पाटील
कोल्हापूर : कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील श्रीमती सिंधुताई भगवानराव पाटील (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. २९) आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62529 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top