१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

व्यसने सोडा, आरोग्य जोडा
एकदा व्यसन लागले की ते कधीच सुटत नाही, असे अनेक जण म्हणतात. पण, ते खोटे आहे. व्यसन सोडण्यासाठी मन कणखर व निग्रही असावे लागते. एक जण तरुणपणी विड्याची थोटके ओढत. विड्यांची बंडलामागून बंडलं फस्त करीत. कधी-कधी ते गांजाही ओढत. ते रोज २०-२५ कप चहा सहज पिऊन टाकत. परंतु, गुढीपाडव्याच्या दिवशी एका क्षणात त्यांनी व्यसने सोडली. त्यानंतर त्यांनी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. व्यसनाधीनतेमुळे माणसाच्या आयुष्याची व घरादाराची राखरांगोळी होते. कुटुंबाची दुर्दशा होऊन ते देशोधडीस लागते. धन जाते, मान जातो, समाजात अप्रतिष्ठा होते. मग ही व्यसनं पाहिजेत कशाला?
हणमंत जोशी, औदुंबर (जि. सांगली)

जलपर्णी मुळासकट काढली पाहिजे
जलपर्णीमुळे डासांचा उपद्रव, पाण्याला उग्र वास, तसेच काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. म्हणून जलपर्णी मुळासकट काढली पाहिजे. त्यापूर्वी नद्यांमधील गाळ काढल्याशिवाय या जलपर्णींचा नाश होणे कठीण आहे. महापुराने वरवरची जलपर्णी वाहून जाते व मुळे तशीच राहिल्याने पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या.’ पाणी स्वच्छ, वासरहित व पिण्यास योग्य राहावे, असे मनापासून वाटत असेल तर प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाताळणे गरजेचे आहे. तरच कोल्हापूर ते नृसिंहवाडीपर्यंतच्या नागरिकांचे आरोग्य चांगले राहील.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62533 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top