डॉ. हेंद्रे प्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. हेंद्रे प्रेस
डॉ. हेंद्रे प्रेस

डॉ. हेंद्रे प्रेस

sakal_logo
By

‘मिनिमल लेप्रोस्कोपी’
अभ्यासक्रमास प्रतिसाद
---
डॉ. प्रवीण हेंद्रे; रंगनाथ हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी रिसर्च सेंटर अशी ओळख असलेल्या रंगनाथ हॉस्पिटलमधील ‘मिनिमल एक्सेस सर्जरी इन लेप्रोस्कोपी सर्जरी’ अभ्यासक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या बॅचमध्ये पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. डॉ. बबन पाटील, डॉ. इंद्रनिल जाधव यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याची माहिती डॉ. प्रवीण हेंद्रे व डॉ. रागिणी हेंद्रे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
रंगनाथ हॉस्पिटलमध्ये १९९१ मध्ये लेप्रोस्क्रोपीची शस्त्रक्रिया पहिल्यांदा झाली. त्यानंतर आजवर २५ हजारांवर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ, तसेच सर्जननी दुर्बीणीतून शस्त्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. अनेक जण येथील अनुभवांतून दुर्बीणीतून शस्त्रक्रिया करण्यात निष्णात बनले. त्याची दखल घेत नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून रंगनाथ हॉस्पिटलला मान्यता दिली आहे.
भारत समाज सेवा व्होकेशनल एज्युकेशन (बीएसएसव्ही) या संस्थेद्वारे रंगनाथ हॉल्पिटलमध्ये नर्सिंग व पॅरामेडिकल कोर्सेसही सुरू झाले आहेत. हे कोर्स दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी अल्प मोबदल्यात शिकविले जातात. यात नर्सिंग, ओटी टेक्निशियन, मॅटर्निटी असिस्टंट, अल्‍ट्रा सोनोग्राफी टेक्निशियन, लेप्रोस्कोपी सहायक आदी कोर्स येथे शिकविले जातील, अशी माहिती डॉ. हेंद्रे यांनी दिली.

चौकट
३० बेडचा जनता वॉर्ड
राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वाचे औचित्य साधून हेंद्रे हॉस्पिटलतर्फे ३० बेडचा राजर्षी शाहू महाराज जनता वॉर्ड सुरू केला आहे. या वॉर्डमध्ये प्रसूतीबरोबरच पोटविकारावरील उपचार व शस्त्रक्रिया अल्प मोबदल्यात होतील, असेही डॉ. हेंद्रे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62555 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top