
डेक्कन स्पोर्ट्स क्लब ची पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन
डेक्कन स्पोर्टस् क्लबची
पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन
कोल्हापूर, ता. २८ : कोल्हापूर व देशविदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्टस् क्लबतर्फे पन्हाळा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ता. २८ रोजी पन्हाळा येथे होणार आहे, अशी माहिती डेक्कन स्पोर्टस् क्लबचे समीर नागटिळक, प्रशांत काटे, उदय पाटील, वैभव बेळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अशी असेल स्पर्धा- ही मॅरेथॉन २१, ११ व ५ किलोमीटर अंतराची असून, हाप मॅरेथॉनमधील ५ किलोमीटरची मॅरेथॉन ही १३ वर्षांपासून पुढील वय व ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१.१ किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांपासून पुढील सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना स्पोर्टस् किट देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी नाव नोंदणी १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, सहभागासाठी क्लबशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62574 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..