अलमट्टी धरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अलमट्टी धरण
अलमट्टी धरण

अलमट्टी धरण

sakal_logo
By

पूरकाळात अभियंत्यांत समन्वय ठेवू
महाराष्ट्र-कर्नाटकच्या अधिकाऱ्यांची बैठक; ‘आलमट्टी’मुळे पूर येणार नाही याची काळजी घेऊ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः आलमट्टी धरणातील पाणी; तसेच कोयना, राधानगरीसह अन्य धरणांतील पाण्याच्या पातळीची वेळोवेळी माहिती घेण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांत समन्वय राखला जाईल. दोन्हीकडील धरणांतील पाण्याचे परिचलन होईल. आलमट्टी धरणातील साठ्यामुळे कृष्णा खोऱ्यात पुराचे संकट ओढवणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे निर्णय महाराष्ट्र व कर्नाटकच्या जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत आज घेतले.
दोन्ही राज्यांतील पुराचे संकट टाळण्यासाठी, दोन्ही राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी अनुभवी व सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत झाला. धरण व्यवस्थापन महाराष्ट्रातील जलसंपदा विभागाशी समन्वय ठेवेल आणि धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गाची माहिती घेईल. महाराष्‍ट्राच्या जलसंपदा विभागातील मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक झाली.
कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर रोखण्यासाठी समन्वय साधून काम करण्याचे आश्वासन दिले. पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यात पूरनियंत्रणासाठी आलमट्टी धरणातील पातळी नियंत्रणात ठेवली जाईल. त्यासाठी दोन्हींकडील जलसंपदा विभागाचे अधिकारी दररोज संपर्क ठेवून माहितीची देवाण- घेवाण करतील, असेही या बैठकीत ठरले.
महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, कोल्हापूरचे अभियंता अशोक सुर्वे, अभियंता रोहित बांदिवडेकर, कोयना धरणाचे नीलेश पोतदार, ‘आलमट्टी’चे एच. सुरेश, अधीक्षक अभियंता डी. बसवराज, सांगलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक आदी अभियंता उपस्थित होते.


पातळी नियंत्रित ठेवणार
कर्नाटक सीमेवरील कृष्णा बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाच किलोमीटर नदीपात्रात बांधलेले नवीन पुलाचे बांधकाम व कॉपर डॅम आणि भराव काढून घेण्याबाबत डी. बसवराज यांनी सहमती दर्शवली. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पूरनियंत्रणासाठी ‘आलमट्टी’ची पातळी नियंत्रित ठेवली जाईल, असेही निश्चित केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62604 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top