आजरा ः राजे समरजीतसिंह बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः राजे समरजीतसिंह बातमी
आजरा ः राजे समरजीतसिंह बातमी

आजरा ः राजे समरजीतसिंह बातमी

sakal_logo
By

25051

सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी
समरजितसिंह घाटगे; भादवण येथे ई-श्रम कार्ड वाटप

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २८ ः मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वीज दरवाढ अशा सर्वच आघाड्यावर महाआघाडी सरकार अपयशी ठरले आहे. जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या बूथ सदस्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. भादवण (ता. आजरा) येथे ई-श्रम कार्डचे वाटप कार्यक्रमात श्री. घाटगे यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, ‘‘तीन वर्ष झाले घोषणा करून देखील प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. वीज दरवाढीबाबत घूमजाव केले आहे. ओबीसी आरक्षणासाठीचा इंपिरियल डेटा न्यायालयात वेळेत सादर न केल्यामुळे आरक्षण गेले आहे. सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नाही. यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा जनता दाखवून देईल.’’
भादवण परिसरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेमप्लेटचे अनावरण श्री. घाटगे यांच्या हस्ते झाले. या वेळी आजरा तालुका भाजपचे उपाध्यक्ष शैलेंद्र मुळीक, भादवण शाखेचे अध्यक्ष हरीश देवरकर, सरचिटणीस अमोल हाळवणकर, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुका उपाध्यक्ष पूजा हाळवणकर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष टी. बी. मुळीक, शिवाजी पाटील, चंद्रकांत केसरकर, तुकाराम सुतार, बाळासाहेब भादवणकर, सुमित कुंभार, निरंजन देवरकर, पांडुरंग जांभळे, नामदेव खुळे, मारुती गाडे, सुदाम पाटील आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


आरोग्य सेवेचा लाभ घ्या
राजे फौंडेशनमार्फत विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने आरोग्य केंद्र सुरू केले असून त्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलशी टाय- अप केले आहे. या केंद्रामधून चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहनही घाटगे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62605 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top