आजरा ः टस्कर नुकसान बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कर नुकसान बातमी
आजरा ः टस्कर नुकसान बातमी

आजरा ः टस्कर नुकसान बातमी

sakal_logo
By

25052

टस्कराने उलटवला
बाचीत पॉवर टीलर
रोजचेच मरण; पिकांचेही नुकसान

आजरा, ता. २८ ः सोहाळे तर्फे बाची (ता. आजरा) येथील तुकाराम कृष्णा कोंडुसकर यांचा पॉवर टीलर टस्करने उलटून टाकला. खरीप मशागतीसाठी शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या साहित्यांची टस्कर मोडतोड करीत सुटला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याचा पंचनामा वन विभागाने केला आहे.
वन विभागाच्या सुलगाव रोपवाटिकेतून टस्कर सोहाळे बाचीकडे आला. त्याने शुक्रवारी (ता. २७) रांगी नावाच्या शेतात शेती मशागतीसाठी ठेवलेला कोंडुसकर यांचा पॉवर टीलर उलटवला. त्याचबरोबर परसू गणपती कोंडुसकर यांची माडाची झाडे, विष्णू गणपती कोंडुसकर यांचे ऊसपीक व मेसकाठीचे नुकसान केले. टस्करच्या वावराने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरीप मशागतीची कामे करताना शेतीसाहित्य व वाहनांचे टस्कर नुकसान करीत असल्याने त्यांना चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे वन विभागाने त्याला या परिसरातून हुसकावून लावावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62606 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top