जिल्हा आपत्ती व्यवस्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन

sakal_logo
By

२५०५७

पूर व्यवस्थापनाची
तलावात प्रात्यक्षिके
कोल्हापूर, ता. २८ ः संभाव्य पूरस्थितीच्या नियोजनासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत राजाराम तलाव येथे साहित्याची चाचणी आणि प्रात्यक्षिके घेतली. स्वयंसेवकांचे प्रशिक्षणही येथे घेण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागासह विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवकांसह जिल्हास्तरावर उपलब्ध रबर मोटर बोटी, लाइफ जॅकेट, लाइफ रिंग, दूर गोटीचे मशीन आदी साहित्याची स्वच्छता, चाचणी केली. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन पथकातील स्वयंसेवकांना पूर व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले.
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापनाचे कौतुक केले. गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत जिल्ह्यातील युवक-युवती आपत्ती व्यवस्थापन कार्यामध्ये अगदी हिरीरीने सहभाग घेत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाची गरज आणि पूर व्यवस्थापनासाठी करावयाचे कार्य याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील सुनील कांबळे, कृष्णात सोरटे, शुभम काटकर, सिद्धार्थ पाटील, दीपक शिंदे, शुभांगी गराडे इत्यादी प्रशिक्षकांनी बोट चालवणे, पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62618 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top