करवंदे, हाळू, फणसाचे गरे अन्‌ बरेच काही...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवंदे, हाळू, फणसाचे गरे अन्‌ बरेच काही...!
करवंदे, हाळू, फणसाचे गरे अन्‌ बरेच काही...!

करवंदे, हाळू, फणसाचे गरे अन्‌ बरेच काही...!

sakal_logo
By

25152
कोल्हापूर : शेवगा शेंगेला अधिक मागणी असते. आवक कमी झाली की, तो महागतो.


शेवग्याच्या दरात १० रूपयांची वाढ

कोल्हापूर, ता. २९ : स्थानिक शेवग्याचे उत्पादन कमी होऊ लागले. त्यामुळे शेवग्याची या आठवड्यात आवक कमी झाली. आता शेवग्याची पेंडी २० रुपये झाली. म्हणजे, एका पेंडीत फक्त तीन शेंगा असतात. आता जो शेवगा मंडईत उपलब्ध आहे, तो सर्व आंध्रप्रदेशातून आला. सोमवार, बुधवार, शनिवारी आंध्रप्रदेशातून शेवग्यांच्या शेंगांनी भरलेली ५० ते ६० पोती कृषी उत्पन्न बाजार समितीत येत आहेत. गेली दोन ते तीन महिने शेवगा प्रचंड प्रमाणात मंडईत आला. दहा रुपयांना सहा ते सात शेंगा दिल्या जात होत्या. आता आवक कमी होऊ लागल्याने एका पेंडीमागे दहा रुपयांत वाढ झाली. हा शेवगा जसा घरोघरी आमटीला लागतो, तशाच पद्धतीने हॉटेल व्यावसायिक अधिक प्रमाणात ते विकत घेतात. अशावेळी शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा येऊ लागतो.

चौकट
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
शेवगा शेंग *२० रुपयांना तीन शेंगा
लाल टोमॅटो *६०
तोंदली *४०
बिनीस *२००
हिरवी मिरची *८०
सॅलड काकडी *३०
ढब्बू मिरची *४०
गाजर *४०
कारली *४०
दोडका *६०
पांढरी वांगी *८०
काळी वांगी *६०
दूधी भोपळा *३०
ूलाल बीट *१० रुपयाला एक नग
कोबी *१० रुपये एक नग
फ्लॉवर *३०/४० रुपये एक नग
आल्लं *४०
हेळवी कांदा *२०/३०
बटाटा *२०/२५
हिरवा टोमॅटो *१०
यवलूजचे काळेभोर मोठे वांगे *४०
भेंडी *४०
जवारी गवारी *६०
बंदरी गवारी *४०
हिरवी चवळी *८०
घोसावळे *५०
स्वीट कॉर्न *१० रुपये एक नग
पिकॅडो मिरची *४०
लिंबू *१० रुपयांना पाच नग/दहा नग
ुसुरण *८०
आळू गड्डा *८०
काटी भेंडी *८०
मुळा *१० रुपयाला एक नग
सांबाऱ्यासाठी कच्ची केळी *५० रुपये डझन
...
चौकट
पालेभाज्या दर (प्रति पेंडी)
कांदापात *१५
मेथी *२५/३०
पालक *१०
शेपू *१०
लाल पोकळा *१५
कोंथींबीर *२०
लाल माट *१०
आंबट चुका *१०
आंबाडा *१०
----------------------------------------------------------
फोटो : 25133 ( ३ कॉलम लावा)
कोल्हापूर : करवंद, जांभळे घेण्यासाठी लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थमध्ये गर्दी होऊ लागली आहे. (सर्व छायाचित्रे : अमोल सावंत)

काळीभोर करवंदे, लालबागचा आंबा अन्‌ जांभळे!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : जून येऊ लागला की, हिरवीकच्च असलेली करवंदांचे घोस काटेरी करंवदीच्या जाळीवर लगडू लागतात. जांभूळही आपलं हिरवी साल सोडून पिकू लागतं. हे सगळं घडते, ते भलामोठा वळीव पाऊस येऊन गेला की. गेल्या आठवड्यात मोसमी पावसारखं वातावरण तयार झालं होतं. पाऊस ही दोन दिवस सडकून पडला. परिणामी, हा रानमेवा झपाट्याने पिकू लागला. राधानगरी, पन्हाळा, करवीरचा पश्‍चिम भाग, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड भागातून करंवे, जांभळांच्या करंड्या येऊ लागल्या आहेत. या करंड्यांमध्ये अनेकदा चिक्कू सारखं दिसणारे हाळूही दिसत आहेत. हे हाळू जूनच्या दुसऱ्या आठवड्यांपासून पक्व होऊ लागतात. आंबट अन्‌ गोड अशी अफलातून चव असलेला हा हाळू पश्‍चिम घाटांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. रानमेव्यांची करंडी सकाळी लवकर मंडईत येऊ लागते. ही भरलेली करंडे देऊन, पैसे घेऊन धनगर बांधव, शेतकरी लवकर गावी परततात. यानंतर स्थानिक विक्रेतेही करंवेदे, जांभळे घेऊन दिवसभर मंडईत बसतात. कापा अन्‌ बरका फणसही भरपूर आले असून फणस सोलून गरे घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. करवंदे, जांभळे ही कोळव्याच्या साह्याने दिली जातात.
रानमेवा विक्रीस सुरु आहे, तिथे गोड असा वास सुटलेला दिसत आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या गोड घमघमाटाने वेधले गेले आहे. आता रत्नागिरी हापूसचा बहर हळूहळू कमी होऊन देशी आंबे येऊ लागले आहेत. यामध्ये रायवळ, लालबागचा आंबा, मानकुर, केसर अशा प्रजाती लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, महाद्वार रोडवर ढकल गाड्यांवर दिसत आहेत. असे चोखूण खाण्यासाठी असणाऱ्या आंब्यांच्या प्रजातींना स्थानिक भाषेत वेगवेगळी अशी नावे आहेत. जसे की, नाव लालबाग; कारण या आंब्याची साल ही देठांजवळ लालभडक असते.
...
चौकट
रानमेवा, फळांचे दर (किलो/डझन)
करंवदे *८०
जांभळे *१५०
फणसांचे तयार गरे *८०
तोतापुरी *१०० रुपयांना चार ते पाच आंबे
तुर्की सफरचंद *२००
ब्राझील सफरचंद *२००
संत्री *१००
चिक्कू *५०/६०
केसर आंबा *१००
हिरवी कलिंगडे *१० ते ३० रुपये एक नग
राणी अननस *५०/६०
मानकुर आंबा *१००
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर (प्रतिकिलो/प्रति तोळा दर) (पुणे बाजारानुसार)
सोन *५२,७६५
चांदी *६२,२००
...
ठळक चौकट
साखर (क्विंटलचा दर) मोठी साखर : ३७०० रुपये किलो (होलसेलप्रमाणे)
...


खाद्यतेलाचे दर (प्रतिकिलो/प्रति लिटर)
शेंगतेल *१९०
सोयाबीन *१९०
सुर्यफुल *१९५
सरकी *१८६

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62716 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top