
श्री अंबाबाई दोन लाखांवर भाविक
25192
श्री अंबाबाई चरणी
दोन लाखांवर भाविक
भवानी मंडपापर्यंत लागल्या लांबच्या लांब रांगा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः नवीन शैक्षणिक वर्षाचे वेध लागले असताना मे महिन्यातील शेवटच्या रविवारचा मुहूर्त साधत आज भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेला. मुख्य दर्शन मंडपापासून भवानी मंडपापर्यंत लांबच्या लांब रांगा लागल्या.
लॉकडाउननंतर यंदाच्या हंगामात श्री अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. गेल्या आठवड्यापासून गर्दी आणखी वाढू लागली. गेल्या रविवारी दीड लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी आले. त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा मोठ्या संख्येने भाविक सहकुटुंब दर्शनासाठी येवू लागले. शुक्रवारी ८७ हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले तर काल एक लाख ४७ हजारांवर भाविक दर्शनासाठी आले. आज सकाळपासूनच मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले. दिवसभर मुख्य दर्शन मंडप हाऊसफुल्ल राहिला. दिवसभरात सुमारे दोन लाखांवर भाविकांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, भाविकांच्या गर्दीमुळे बिंदू चौकासह मंदिराला जोडणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62778 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..