इचलकरंजीत १२२ छावण्यांचे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत १२२ छावण्यांचे नियोजन
इचलकरंजीत १२२ छावण्यांचे नियोजन

इचलकरंजीत १२२ छावण्यांचे नियोजन

sakal_logo
By

इचलकरंजीत १२२ छावण्यांचे नियोजन
संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर पालिकेची यंत्रणा सज्ज

इचलकरंजी, ता. २९ ः या वर्षीची संभाव्य पूस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच पालिकेची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे. यामध्ये पूर परीस्थिती निर्माण झाल्यास १२२ छावण्यांचे नियोजन केले आहे. येथे किमान ५ हजार कुटुंबांची व्यवस्था केली आहे. प्रशासकीय कामाच्या सोयीस्तव पूरबाधित क्षेत्राचे पाच विभाग केले आहेत. त्यानुसार संभाव्य नियोजन करण्यात येत आहे.
दरवर्षी पावसाळा आला की संभाव्य वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आपत्कालीन सर्व यंत्रणा सज्ज ठेवली जाते. महापुरासारखे संकट आल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच सर्व प्रकारची पूर्व तयारी केली जाते. यामध्ये पालिका प्रशासनाची कसरत होते. पण यंत्रणा सज्ज ठेवल्यास आपत्कालीन परिस्थिती हाताळणे सोपे जाते. यंदाही संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने आतापासून आवश्यक कृती आराखडा सज्ज ठेवला आहे. त्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. यापूर्वी साधारणपणे एकूण तीन प्रशासकीय वॉर्डाचे पूर्ण क्षेत्र बाधित झाले होते. तीन वॉर्डाला अंशतः पुराचा फटका बसला होता. या वर्षी प्रशासकीय कामाकाजात सुलभता येण्यासाठी पाच पूरग्रस्त विभाग तयार केले आहेत. त्यानुसार नियोजन केले जात आहे.
---
पूर दृष्‍टिक्षेप...
२००५ मध्ये इचलकरंजीला महापुराचा मोठा फटका बसला होता. पंचगंगा नदीतील पाण्याची पातळी ७६ फुटावर गेली होती. ६८ फूट ही इशारा तर ७१ फूट ही धोका पातळी आहे. त्यानंतर २०१९ मध्ये तब्बल ८० फुटांवर पुराची पातळी होती. तुलनेने गेल्या वर्षी ७८.४ फुटांपर्यंत पूर पातळी पोहोचली होती. गेल्यावर्षी तब्बल ७६०० कुटुंबांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले होते. तर २५० हून अधिक यंत्रमाग कारखान्यांत पुराचे पाणी आले होते.
-----
पूरबाधित क्षेत्र
लक्ष्मी दड्ड वसाहत, नदीवेस, कटके गल्ली, टाकवडे वेस, आंबी गल्ली, बौद्ध विहार परिसर, मुजावर पट्टी, आवाडे वीज उपकेंद्र, पी.बा.पाटील मळा, तणंगे मळा, ढोले पाणंद, श्रीपादनगर, ढोरवेस, गुजरी पेछ, टीळक रोड, सारवान बोळ, बागडी गल्ली, चांदणी चौक, विकली मार्केट, त्रिशुल चौक, पिराचा मळा, कलावंत गल्ली, तोडकर गल्ली, जुना चंदूर रोड परिसर.
----
संभाव्य तयारी
२४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्ष
१२२ ठिकाणी पुनर्वसन छावण्या
छावण्यांमध्ये ५ हजार कुटुंबांची व्यवस्था
आवश्यक कर्मचारी वर्ग नियुक्ती
धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही सुरू
साथीच्या रोगावर नियंत्रणासाठी यंत्रणा
----
उपलब्ध साधने
यांत्रिक बोट -२, साधी बोट -१, लाईफ जॅकेट - २५, लाईफ जॅकेट -२५, लाईफ रिंग्ज -६, दोर - ५०० फुट, मेगा फोन - ३ नग, गळ - ३ नग, इनर - २ सेट, इमर्जन्सी लॅम्प - २ नग, स्लायडिंग शिडी - ३ नग, रिफ्लेक्टीव्ह जॅकेट - ८ नग, मोठे टॉर्च - २ नग, दुर्बिण - ३ नग.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62802 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top