संघर्ष, फिजिक जिम, गुफाची घौडदौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष, फिजिक जिम, गुफाची घौडदौड
संघर्ष, फिजिक जिम, गुफाची घौडदौड

संघर्ष, फिजिक जिम, गुफाची घौडदौड

sakal_logo
By

gad2914.jpg
गडहिंग्लज : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट लिगमध्ये शुभम आजगेकर आणि यश पाटील यांच्यात चेंडूसाठी सुरु असलेली चढाओढ.
(आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)


संघर्ष, फिजिक जिम, गुफाची घौडदौड
शिवराज-युनायटेड लिग; श्रवण पाटील, सुरज हनिमनाळेने दिवस गाजविला
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट फुटबॉल लिगमध्ये आज तिसऱ्या दिवशी संघर्ष फायटर्स, फिजिक जिम वॉरियर्स, गुफा गार्डीयन्स, युनायटेड रायझिंग स्टार्स संघानी आपपल्या प्रतिस्पर्ध्याना हरवित घौडदौड केली. इफाचा श्रवण पाटीलने स्पर्धेतील पहिली हॅट्रटीक तर संघर्षचा सुरज हनिमनाळे, श्रवण जाधवने दोन गोल करून दिवस गाजविला. येथील गडहिंग्लज यूनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. सामने पहाण्यासाठी शौकीनांची गर्दी होती.
पहिल्या सामन्यात दादा जिएम चॅलेजर्सं विरूध्द फिजिक जिम वॉरियर्स हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. फिजिक जिमचा कर्णधार सिध्दार्थ दडडीकरने तर दादा चॅलेजर्सचा गोलरक्षक आणि बचावफळीतील गोंधळामुळे स्वयंगोल झाला. दुसऱ्या सामन्यात संघर्ष फायटर्सने धडाकेबाज खेळ करीत तुल्य़बळ गुफा गार्डीयन्सला ४ गोलने पराजित केले. संघर्षचा सुरज हनिमनाळेने दोन सुरेख गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रथमेश परदेशी, सौरभ शिंदे यांनी प्रत्येकी एक गोल केला.
इफा लायन्सने दादा जीएम चॅलेंजर्सचा ९ गोलने मोठा पराभव केला. इफाचा श्रवण पाटीलन स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक करण्याचा बहुमान पटकाविला. सौरभ मकशीने दोन तर सौरभ मोहिते, आयर्न दळवी, विद्याधर धबाले यांनी प्रत्येकी एक गोल मारला. युनायटेड रायझिंग स्टार्सने फिजिक जिम वॅारियर्सला चुरशीच्या सामन्यात ४-२ असे नमविले. युनायटेड रायझिंगचा श्रवण जाधवने जाधवने दोन, तनिष्क गायकवाड, अवधूत चव्हाणने तर फिजिकच्या गोपी बणगे, सिध्दार्थ दड्डीकरने एक गोल केला. ओमकार जाधव, सुरज कोंडूस्कर, सुल्तान शेख, रोहित कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

चौकट..
सामनावीर, लढवय्या
आयर्न दळवी, सौरभ शिंदे यांना सामनावीर तर विनायक हलसोडे, अब्दूल कोचरगी, गोपी बणगे यांना लढवय्या खेळाडू म्हणून क्रीडासाहित्य देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62858 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top