टेनिस स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेनिस स्पर्धा
टेनिस स्पर्धा

टेनिस स्पर्धा

sakal_logo
By

लोगो :
टेनिस स्पर्धा

नरसिंघानी, तोमर, चाफळे मुख्य फेरीत    
कोल्हापूर, ता. २९ : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटना (केडीएलटीए)तर्फे आयोजित व डी. वाय. पाटील पुरस्कृत १४ व्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अश्विन नरसिंघानी, प्रद्युम्न तोमर, अवनीश चाफळे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला. 
केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धा सुरू आहेत. मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत कोल्हापूरच्या बिगर मानांकित अश्विन नरसिंघानी याने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत तमिळनाडूच्या अव्वल मानांकित जी. बालासूर्याचा ६-२, ३-६, ७-६(६) असा पराभव केला. महाराष्ट्राच्या प्रद्युम्न तोमरने गुजरातच्या तिसऱ्या मानांकित अक्षज सुब्रमणियनचा ६-२, ६-१ असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. बाराव्या मानांकित पुद्दुचेरीच्या प्रणव सर्वण कुमार याने राजस्थानच्या सहाव्या मानांकित अमित मूदचा ६-२, ७-६(५) असा तर, महाराष्ट्राच्या अवनीश चाफळेने तेलंगणच्या सातव्या मानांकित लोकेश राहुलचा ६-४, ३-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. 
   मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या सोळाव्या मानांकित पेहल खराडकर हिने कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित साई जानवी टी चा ६-४, ७-५ असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेची मुख्य ड्रॉची मानांकन यादी आज जाहीर करण्यात आली असून त्यात मुलींच्या गटात उत्तराखंडच्या नियती कुकरेतीला अव्वल मानांकन देण्यात आले. तर कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव दुसरे, तर कर्नाटकच्या श्रीनिधी बालाजीला तिसरे मानांकन देण्यात आले. मुलांच्या गटात कर्नाटकच्या क्रिश त्यागीला अग्रमानांकन देण्यात आले.  

खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: 
मुले: १. क्रिश त्यागी(कर्नाटक), २.साहो देबसिस(ओडिशा), ३.वंश नांदल(हरयाणा), ४.तेजस आहुजा(हरयाणा), ५.धुरव सचदेवा(हरयाणा), ६.अर्जुन राठी(हरयाणा), ७.स्वस्तिक शर्मा(दिल्ली), ८.रेथीन प्रणव आरएस(तामिळनाडू);

मुली: १.नियती कुकरेती(उत्तराखंड), २.ऐश्वर्या जाधव(महा), ३.श्रीनिधी बालाजी(कर्नाटक),४.हर्षिनी विश्वनाध(आंध्रप्रदेश),५.नैनिका बेन्द्रम(महा), ६.मनोज्ञ मदसू(आंध्रप्रदेश),७.सायली ठक्कर(गुजरात), ८.शगुन कुमारी(उत्तरप्रदेश).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62864 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top