
फुटबॉल
२५२४१
फुटबॉल
बालगोपाल, पीटीएम, प्रॅक्टिसची आगेकूच
कोल्हापूर, ता. २९ : नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने झुंजार क्लबवर ४ - २ ने विजय मिळवला. पाटाकडील तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळवर ३ - १ ने विजय मिळवला तर बालगोपाल तालीम मंडळाने संध्यामठ तरुण मंडळवर ३- २ ने विजय मिळवत आगेकूच केली. आजचा पहिला सामना प्रॅक्टिस विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात झाला. या सामन्यात ‘प्रॅक्टिस’ ने आपली पकड मजबूत ठेवली. तर ‘झुंजार’ ने चांगला प्रतिकार करत रोमांच आणले. पूर्वार्धात ‘प्रॅक्टिस’ च्या आकाश माळी याने १९ व्या मिनिटाला व इंद्रजित चौगले याने ४० व्या मिनिटाला गोल नोंदवत २ - ० अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात ‘प्रॅक्टिस’ ने पुन्हा आक्रमण करत गोलसाठी प्रयत्न केले. यामध्ये आकाश माळी याने ५८ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा व संघासाठी तिसऱ्या गोलची नोंद करत आघाडी भक्कम केली. पाठोपाठ ‘झुंजार’ च्या राजेश बेडेकर याने ६६ व्या मिनिटाला गोल नोंदवत आघाडी एक गोलने कमी केली. यानंतर ‘प्रॅक्टिस’च्या ओंकार मोरे याने ७८ व्या मिनिटाला तर ‘झुंजार’ च्या अवधूत पाटोळे याने अधिकच्या वेळेत गोल नोंदवला. अखेर आहे समान ‘प्रॅक्टिस’ने ४-२ असा जिंकला. दुसरा सामना पीटीएम विरुद्ध ऋणमुक्तेश्वर यांच्यात झाला. पीटीएमच्या सिद्धार्थ पाटील याने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवला तर ऋणमुक्तेश्वरच्या आकाश मोरे याने ३९ व्या मिनिटाला गोल नोंदवत पूर्वार्धात सामना एक गोल बरोबरीत राहिला. उत्तरार्धात पीटीएमच्या ऋषिकेश मेथे - पाटील याने ४७ व्या मिनिटाला तर यश देवणे याने मिळालेल्या पेनल्टीवर ५५ व्या मिनिटाला गोल नोंदवत ३ - १ असा विजय साजरा केला. तिसऱ्या सामन्यात बालगोपालने वर्चस्व राखले. पूर्वार्धात संध्यामठने अखेरच्या क्षणाला आघाडी घेतली. अधिकच्या वेळेत यश जांभळे याने गोल नोंदवत सामना १ - ० असा केला. उत्तरार्धात बालगोपालने आक्रमक खेळ केला ४६ व्या मिनिटाला शुभम जाधव, ४९ व्या मिनिटाला प्रतीक पोवार याने गोल नोंदवत सामन्यात २ - १ अशी आघाडी घेतली. यानंतर संध्यामठला मिळालेल्या पेनल्टीचा फायदा घेत आशिष पाटील याने ५९ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना २ - २ असा बरोबरीत आणला. यानंतर बालगोपालच्या सूरज कांदळकर याने ७५ व्या मिनिटाला गोल नोंदवून सामना ३ - २ असा जिंकला.
आजचे सामने
सकाळी ७ बीजीएम विरुद्ध उत्तरेश्वर
सकाळी ९ सम्राटनगर विरुद्ध खंडोबा तालीम
संध्याकाळी ४ शिवाजी मंडळ विरुद्ध कोल्हापूर पोलिस
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62880 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..