
संक्षिप्त
25260
शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची भेट
कोल्हापूर ः सुळे (ता. पन्हाळा) येथील कुंभी-धामणी सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आजवर एक हजार ५८३ वेगवेगळ्या आजारांच्या शस्त्रक्रिया मुंबई, पुणे, सांगली आणि कोल्हापूर आदी ठिकाणी मोफत केल्या आहेत. त्यातील पावणेतीन कोटी रुपयांच्या ७२ शस्त्रक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून झाल्या आहेत. संबंधित रुग्णांसह संस्थेचे डॉ. अजित पाटील यांनी आज श्री. राऊत यांची भेट घेतली. यावेळी सागर पाटील, सचिन पाटील, धनाजी पाटील, बाजीराव शियेकर, संदीप पाटील, सागर मोळे, सुरेश पाटील, गुंडाजी पोवार आदी उपस्थित होते.
.........
२५२६१
मुस्लिम बोर्डिंगमध्ये वधू-वर मेळावा
कोल्हापूर ः येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये आज मराठा व मुस्लिम समाजातील वधू-वरांसाठी मेळाव्याचे आयोजन झाले. दोन समाजातील वधू-वर व पालकांचा हा मेळावा एकाच छताखाली झाला. एकाच छताखाली दोन्ही समाज एकवटले असले तरी दोन्ही समाजातील वधू-वर व पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मुस्लिम बोर्डिंगचे गणी आजरेकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y62886 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..